तसा ‘तो’ होमगार्डच पण नशीब पालटलं आणि तो झाला एक कोटी रुपयांसह एका कारचा मालक !
गोरखपूर शहरातल्या सिकरीगंज परिसरात ड्यूटी करणाऱ्या होमगार्डचं नशीब रातोरात बदलेल, असा विचारही कुणी केला नव्हता. विवेकानंद सिंह असं या होमगार्ड जवानाचं नाव आहे. त्याचं आयुष्य सर्वसामान्य व्यक्तीसारखं फारसं काही खास नव्हते. रात्री १२ नंतर विवेकानंद यानं फोन घेतला, मेसेज चेक केला. तेव्हा त्यांचे नशिबच चमकलं. होमगार्ड असलेला विवेकानंद केवळ कोट्यधिशच बनला नाही तर तो एका लग्झरी कारचा मालकही झालाय.
यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना विवेकानंद सिंह म्हणाला, ‘हा मेसेज आल्यानंतर मला आधी विश्वासच बसला नाही. मला नातेवाईकांनी फोन केले. त्याचसोबत आयजी ऑफिसमधूनही मला अभिनंदन करणारा कॉल आला. इतके पैसे जिंकले तरीही मी माझी ड्युटी करत राहणार आहे. ड्युटी माझे कर्तव्य आहे.
मी जिंकलेले पैसे माझ्या भविष्यासाठी घर, जमीन खरेदी करण्यासाठी वापरणार आहे. शेतीसाठी पैसेही वाचवणार आहे. लॉटरीत इतके पैसे जिंकेन, असं मला कधी वाटले नव्हते. देवाने जे दिले त्यामुळे मी आणि माझे कुटुंबीय खूप खुश आहोत’.
विवेकानंद हा सुट्टीवर घरी आला होता. तेव्हा छोट्या मुलांना पाहून मी ऑनलाईन अँपमध्ये पैसे लावून टीम बनवायला लागलो. त्यात मला रस येऊ लागला.
टाईमपास म्हणून टीम बनवली. मागील ६ महिन्यांपासून असे करतोय. प्रत्येक दिवशी १५० रुपये मॅचवर लावतो. सोमवारी चेन्नई आणि लखनौ मॅचवेळी फक्त ४९ रुपये लावले होते. त्यानंतर मी कोट्यवधी जिंकले. कारही मिळाली. लॉटरी जिंकल्यामुळे घरात आणि नातेवाईकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.