… तर अजित पवार यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद देऊ ; केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचं वक्तव्य ! 

spot_img

… तर अजित पवार यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद देऊ ; केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचं वक्तव्य ! 

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्ष नेते अजित पवार जर आमच्या पक्षात म्हणजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) सहभागी झाले तर त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद देऊ, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नुकतंच पत्रकारांशी बोलताना केलं.

केंद्रीय मंत्री आठवले म्हणाले की अजित पवार हे भाजपमध्ये जातील असं मला वाटत नाही. वास्तविक पाहता देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची जुनी मैत्री आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा असलेले शरद पवार यांचे अजित पवार हे पुतणे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांना अनेक पद दिली गेली आहेत.

केंद्रीय मंत्री आठवले म्हणाले की मला जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली तर ते पद अजित पवारांना देईन. मात्र त्यांनी आरपीआय आठवले गट या पक्षात प्रवेश करायला हवा. मध्यंतरी अजित पवार यांचा फोन लागत नव्हता. पित्ताच्या त्रासाने त्यांनी काही तास आराम केला, असा खुलासा यापूर्वीच समोर आला आहे.

दरम्यान, या मुद्द्यावर पत्रकारांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना छेडले असता ते म्हणाले की अजित पवार हे आमच्या पक्षात आले तर आम्हाला आनंद होईल. आम्ही त्यांना मुख्यमंत्री पद देऊ. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चांना उधाण आलं आहे.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :