… तरच शेवगाव पोलीस पोहोचतील ‘ड्रिमगर्ल’च्या मूळ मालकापर्यंत!
अहमदनगर जिल्ह्यातल्या शेवगाव पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी गेल्या आठवड्यात ‘ड्रिमगर्ल’ नाव असलेल्या मालमोटारीसह लाखो रुपयांचा रेशनचा तांदूळ पकडला होता.
वास्तविक पाहता त्या बातमीद्वारे उपस्थित केलेल्या प्रश्नाचं उत्तर शेवगाव पोलीस अद्यापपर्यंत देऊ शकलेले नाही. अर्थात ‘ड्रिमगर्ल’च्या मूळ मालकापर्यंत पोहोचण्यात शेवगाव पोलीस अद्यापही यशस्वी झालेले नाही.
या कारवाईत शेवगाव पोलिसांनी एका साध्या ट्रान्सपोर्टवाल्याला आरोपी केलेले आहे. मात्र हा ट्रान्सपोर्टवाला या भ्रष्टाचाराच्या साखळीतला एक छोटा मासा आहे. रेशन माफियांसाठी काम करणारा ‘प्यादा’ आहे. मूळ रेशनमाफिया वेगळेच आहेत.
या मूळ रेशनमाफियापर्यंत पोहोचण्यासाठी शेवगाव पोलिसांना विशिष्ट प्रकारची तसदी घ्यावी लागणार आहे.
तत्पूर्वी शेवगाव पोलिसांनी दाखविलेल्या सध्याच्या आरोपीविषयी सांगायचं झाल्यास हा आरोपी खेड्यापाड्यांतल्या स्वस्त धान्य दुकानदारांकडून रेशनचं धान्य गोळा करण्याचे काम करतो.
मुख्य रेशनमाफिया प्रथमत: दलालाकडे चौकशी करतो, कंपनीचा रेट काढतो? – रेट आणि राईस मिल फायनल झाली की, रेशनमाफिया मालमोटारीच्या मालकांना फोन करतो, ते मालमोटारीच्या चालकांशी संपर्क करतात आणि त्यानंतर संबंधित मिलला तो माल पाठवला जातो. म्हणजे यामध्ये खेड्यापाड्यांतले स्वस्त धान्य दुकानदार, दलाल, शेवगाव पोलिसांना अटक दाखवलेला आरोपी, रेशनमाफिया, राईस कंपन्या, मालमोटारींचे मालक आणि चालक अशी या भ्रष्टाचारात मोठी साखळी आहे.
शेवगाव पोलिसांनी ज्या ट्रान्सपोर्टवाल्याला आरोपी केलंय, हा एक छोटासा ‘प्यादा’ आहे. या आरोपीला रेशन चे धान्य गोळा करण्याअगोदर व नंतर रेशनमाफियाने केलेले फोन व त्याच वेळी रेशनमाफियाने दलाल आणि कंपनीला केलेले फोन या सर्वांचा सीडीआर शेवगाव पोलिसांनी चेक केला तर ‘ड्रिलगर्ल’ पर्यंत पोहोचणं शेवगाव पोलिसांना सहज शक्य होणार आहे.
केंद्र तसंच राज्य सरकार ज्या लोकांना मोफत आणि माफक दरांत 2 ते 3 रुपये किलोप्रमाणे आणि मोफत गहू आणि तांदूळ दर महिन्याला देतं, ती माणसं दारिद्र्यरेषेखालील आणि दारिद्र्यरेषेवरील म्हणजे आर्थिकदृष्ट्या अत्यंत मागासलेली आहेत.
दुसर्या बाजूला या आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या लोकांच्या हक्काचं धान्य कमी भावात विकत घेऊन ठिकठिकाणच्या राईस मिल्सना Rise Mill’s ते चढ्या भावानं विकून ही मंडळी आर्थिकदृष्ट्या प्रचंड गब्बर झालेली आहेत. या भ्रष्टाचारात वर उल्लेख केलेली सारी माणसं गरीबांचा हक्काचा घास असलेल्या धान्याचा काळाबाजार करुन ‘ढेकणा’सारखी टम्म फुगली आहेत.
शेवगाव पोलिसांना या ‘ढेकणां’ना नष्ट करायचं खरं तर पवित्र कार्य करायचंय. हे पवित्र कार्य ‘खाकी’शी इमान राखून शेवगाव पोलिसांनी करावं, आणि आर्थिकदृष्ट्या अत्यंत मागास असलेल्या गरीबांचा आशिर्वाद घ्यावा. फक्त शेवगाव पोलीसच नाही तर संपूर्ण नगर जिल्ह्यात सरकारी धान्याच्या भ्रष्टाचारात पुरवठा विभागाच्या काही अधिकारी आणि कर्मचार्यांचे हात बरबटलेले आहेत.
मात्र या भ्रष्टाचारात नखशिखांत बुडालेल्या पुरवठा विभागाच्या काही अधिकारी कर्मचार्यांसह नगर जिल्हातील
अल्पावधीत कमावलेली करोडोची संपत्ती, आलिशान गाड्यांचा घरासमोर ताफा, इंपोर्टेड दुचाकी गाड्या, अंगावर किलोने सोने, मोठमोठे प्लॉट वर राजकारण्यांना लाजवतील असे आलिशान बंगले, व मोक्याच्या ठिकाणी असलेले भूखंड, अशी संपत्ती कमावलेले रेशनमाफिया ‘महासत्ता भारत’च्या रडारवर आहेत.
पीआय पुजारीसाहेब! गरीबांना न्याय द्या!- शेवगाव पोलिसांनी कशा प्रकारे एखाद्या गुन्ह्याचा तपास कराव, हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे. मात्र असं करतांना समाजातल्या गरीबांवर अन्याय होणार नाही, याची काळजी शेवगाव पोलिसांनी घ्यायला हवीय.
यासाठीच ‘महासत्ता भारत’नं हा खटाटोप चालवलाय. वर्दीचा सदुपयोग करुन शेवगाव पोलिसांना ‘ड्रिमगर्ल’पर्यंतच्या मूळ मालकासह भ्रष्टाचाराच्या या साखळीचा शोध घ्यायचाय, की या सर्वांना उजळमाथ्यानं फिरु द्यायचं, याचा निर्णय घ्यायचाय.
या शब्दप्रपंचाद्वारे शेवगाव पोलीस ठाण्याचे पीआय पुजारींना ‘महासत्ता भारत’चं हे जाहीर आव्हान आहे, की शेवगाव तालुक्यातल्या गरीबांना न्याय द्या !
पुढील भागात उद्या भेटू….!