तमाम देशवासियांना उद्या मिळणार 75 रुपयांचा शिक्का ; कसा आहे हा शिका वाचा आणि घ्या जाणून… !
अवघ्या काही तासानंतर भारत देशाला नवीन संसद भवन (New Parliament Building) मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते 28 मे रोजी नवीन संसद भवनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या सोहळ्यानिमित्त अर्थमंत्रालयाकडून (Ministry Of Finance) मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या उद्घाटनाच्या वेळी अर्थमंत्रालय 75 रुपयांचे विशेष नाणं लॉन्च करणार आहे.
अर्थमंत्रालयाने अधिसूचना जारी करत याबाबतची घोषणा केली आहे. 75 रुपयांचे हे नाणं नेमकं कसं असणार आहे आणि त्याचे खास वैशिष्ट्य काय आहे, या लेखातून जाणून घ्या.
अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 75 रुपयांचे हे नाणं भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे (75 years of independence) पूर्ण झाल्याचे महत्त्व दर्शवणार आहे. या नाण्यावर रुपयाचे चिन्ह देखील असेल आणि अंकांमध्ये 75 लिहिलेले असेल. या 75 रुपयांच्या नाण्याच्या एका बाजूला अशोक स्तंभाचा सिंह असेल. त्याखाली ‘सत्यमेव जयते’ असे लिहिलेले असेल.
डावीकडे देवनागरी लिपीत ‘भारत’ आणि उजवीकडे इंग्रजीत ‘इंडिया’ लिहिलेले असेल. 75 रुपयांचे हे नाणं 44 मिमी व्यासाचे गोलाकार असेल. अर्थ मंत्रालयाने सांगितल्याप्रमाणे, या नाण्यावर संसदेच्या नवीन इमारतीची देखील प्रतिमा असेल. संसद भवनच्या वरच्या बाजूला हिंदीत ‘संसद संकुल’ आणि खालच्या बाजून इंग्रजीमध्ये ‘Parliament Complex’ लिहिलेलं असेल.
75 रुपयांचे हे नाणं चार धातूंपासून तयार केलेले असेल. त्यात 50 टक्के चांदी, 40 टक्के तांबे, 5 टक्के निकेल आणि 5 टक्के झिंक असेल. 75 रुपयांच्या या नाण्याचे वजन 35 ग्रॅम असेल. हे नाणं भारत सरकारच्या कोलकाता टांकसाळीत तयार करण्यात आले आहे.
या नाण्यावरील संसद परिसराच्या प्रतिमेच्या खाली ‘2023’ हे वर्ष कोरले जाईल. या नाण्याची रचना राज्यघटनेच्या पहिल्या अनुसूचीमध्ये दिलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार असेल. या नाण्याची रचना खूपच खास पद्धतीने करण्यात आली आहे.