तत्कालीन एनसीबी ऑफिसर समीर वानखेडेविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल !

spot_img

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या कथित ड्रग्जप्रकरणात 25 कोटी रुपये मागितल्या प्रकरणी तत्कालीन एनसीबी ऑफिसर समीर वानखेडे यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणातल्या दोन तपासी अधिकाऱ्यांना काही दिवसांपूर्वीच निलंबित करण्यात आलं होतं.

दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर समीर वानखेडे यांच्या मालमत्तेवर सीबीआयने छापे टाकले आहेत. सीबीआयने मुंबई, दिल्ली, रांची, कानपूर या ठिकाणी छापेमारी केली आहे.

समीर वानखेडे यांच्यासह इतर चार जणांविरुद्ध आर्यन खान कथिच ड्रग्जप्रकरणी अभिनेता शाहरुख खानला 25 कोटी मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. समीर वानखेडे पूर्वी मुंबई महत्त्वाच्या पदावर कार्यरत होते आता त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :