डीजेच्या कर्कश आवाजाने महिनाभर कोमात असलेल्या शिक्षकाचा मृत्यू..! डीजे ला गांभीर्याने घेण्याची आवश्यकता;

spot_img

डीजेच्या कर्कश आवाजाने महिनाभर कोमात असलेल्या शिक्षकाचा मृत्यू..!
डीजे ला गांभीर्याने घेण्याची आवश्यकता;

अहमदनगर – (दि.७ मे):- जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील नारायण आश्रमचे केंद्रप्रमुख असलेल्या अशोक बाबुराव खंडागळे (वय ५८) यांना डीजेच्या कर्कश आवाजाने त्रास झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

डीजेच्या आवाजाने त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. महिनाभर त्यांनी मृत्यूशी झुंज दिली. अखेर शनिवारी (दि.६ मे) रोजी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. अशोक खंडागळे हे हनुमान जयंतीच्या दिवशी कौडाणे (ता.कर्जत) येथे गेले होते. तेथे डीजेच्या आवाजाने त्यांना त्रास होऊ लागला. त्यातच ते कोमात गेले. महिनाभर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले.

मात्र, त्यांची झुंज अपयशी ठरली. शनिवारी सकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर पार्थिवावर कौडाणे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. अशोक खंडागळे यांनी ज्ञानदानाचे काम अतिशय प्रामाणिकपणे केले. ३१ मे रोजी ते सेवानिवृत्त होणार होते. त्या निमित्त शिक्षकांनी सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आयोजित केला होता.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :