झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओचे शेअर विक्रमी उच्चांकाच्या जवळ, तुम्ही आता खरेदी करावं किंवा प्रतीक्षा करावी?
मुंबई: आपल्या जोरदार तुतिमाही निकालांच्या जोरावर दिग्गज दिवंगत गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट बँक स्टॉक, फेडरल बँकेच्या शेअर्समध्ये आजच्या व्यापार सत्रात तेजी दिसून आली. फेडरल बँकेच्या तिसऱ्या तिमाही निकालानंतर शेअरमध्ये नफावसुली दिसून आली. ऑक्टोबर-डिसेंबर २०२२ या तिमाहीत बँकेच्या निव्वळ नफ्यात ५४ टक्के (YoY) वाढ झाली, तर निव्वळ व्याज मार्जिनने विक्रमी उच्चांक गाठला. निकालानंतर फेडरल बँकेच्या शेअरवर ब्रोकरेज हाऊस देखील बुलिश दिसत आहेत. बहुतांश ब्रोकरेजने शेअर खरेदीचा (बाय) सल्ला दिला आहे. लक्षणीय आहे की गेल्या ६ महिन्यांत स्टॉकमध्ये सुमारे ३३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
शेअरचा भाव वाढला
बँकेने सोमवारी डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले, ज्यानंतर बाजारातील गुंतवणूकदारांनाही फायदा झाला. मंगळवारच्या व्यवहार सत्रात शेअरने १४३ रुपयांची किंमत गाठली, जी विक्रमी उच्चांकाच्या अगदी जवळ आहे. मात्र, नंतर प्रॉफिट बुकींगच्या दबावामुळे शेअर घसरला. विशेष म्हणजे फेडरल बँकेचा शेअर राकेश झुनझुनवालांचा पोर्टफोलिओत देखील असून, दिग्गज गुंतवणूकदारांचा बँकेतील हिस्सा सप्टेंबरच्या तिमाहीत २.६ टक्के होता. तर डिसेंबर तिमाहीचे अपडेट्स अद्याप प्रसिद्ध झालेले नाहीत.
ब्रोकरेजचा सल्ला काय
मॉर्गन स्टॅनलीने फेडरल बँकेवर ‘ओव्हरवेट’ रेटिंग कायम ठेवली असून लक्ष्य किंमत १६५ रुपयांवरून १७५ रुपये निश्चित केली आहे. तसेच सिटीने देखील फेडरल बँकेवर ‘बाय’ करण्याचा सल्ला देत लक्ष्य किंमत १५३ रुपयांवरून १६५ रुपये केली आहे. ब्रोकरेजने म्हटले की मालमत्तेच्या पुनर्मूल्यांकनाला व्याजदरात झालेल्या वाढीमुळे पाठिंबा मिळत राहील.
याशिवाय ICICI सिक्युरिटीजने १७० ची लक्ष्य किंमत देत बँक स्टॉकवर खरेदीचा सल्ला दिला. त्याच वेळी, मोतीलाल ओसवाल यांनी फेडरल बँकेच्या स्टॉकवर खरेदीचे मत कायम ठेवले आणि प्रति शेअर १७० रुपये लक्ष्य किंमत ठेवली.
व्याज उत्पन्न वाढले
३१ डिसेंबर २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीत बँकेचे व्याज उत्पन्न २७.१४ टक्क्यांनी वाढून १,९५६ कोटी रुपये झाले आहे. आर्थिक वर्ष 2022-23 च्या तिसऱ्या तिमाहीत हा आकडा १,५३९ कोटी रुपये होता. तिसऱ्या तिमाहीत बँकेचा ऑपरेटिंग नफा वार्षिक आधारावर ९१४ कोटींवरून वाढून १,२७४ कोटी झाला आहे.