ज्येष्ठ नागरिकाच्या खात्यातून ऑनलाईन रक्कम हडपल्या प्रकरणी आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला

spot_img

ज्येष्ठ नागरिकाच्या खात्यातून ऑनलाईन रक्कम हडपल्या प्रकरणी आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला

बीड: बीड येथील सेवानिवत्त विमा अधिकारी सीताराम आघाव यांचे स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा वासनवाडी येथील बचत खात्यातून ऑनलाईन फसवणुकीने एक लाख चौदा हजार रुपये आरोपी लक्ष्मण श्याम घाडगे याने मोबाईल द्वारे स्वतःचे बँक खात्यावर वर्ग करून हडप केले अशा आशयाची फिर्याद शिवाजीनगर पोलीस ठाणे बीड येथे गुन्हा क्रमांक ४३८/२०२२ अन्वये दाखल झाल्यानंतर आरोपीने बीड जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळणे कामी अर्ज दाखल केला होता त्यावर आज दिनांक १२एप्रिल रोजी सुनावणी होऊन माननीय चौथे जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमान आर एस पाटील साहेब यांनी आरोपीचा बचाव रद्द करून सदर गुन्ह्यातून त्यास अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला आहे.

याबाबत थोडक्यात माहिती अशी की आरोपी लक्ष्मण घाडगे याने फिर्यादी सिताराम आघाव यांच्याशी सलगी करून त्यांना विश्वासात घेऊन त्यांचे कडील मोबाईल गैरविश्वासाने स्वतःकडे घेतला व त्या मोबाईल मधून ऑनलाइन व्यवहार फिर्यादीचे परस्पर स्वतःचे खात्यावर करून एकूण एक लाख 14 हजार रुपयांना फिर्यादीस गंडा घातला. ही बाब फिर्यादीस माहीत झाल्यानंतर त्यांनी थेट शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठून आरोपीचे विरुद्ध रीतसर कलम 420 भादवी व कलम 66 माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये फिर्याद नोंदवली.

ही बाब आरोपीस माहीत झाल्यानंतर त्याने स्वतःचा बचाव करने कामी बीड न्यायालयात सदर गुन्ह्यातून त्यास अटक टाळण्याच्या हेतूने अटकपूर्व जामीनाची मागणी केली होती सदर अर्जावर सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील श्री अजय राख व फिर्यादीतर्फे वकील श्री अनिल बारगजे यांनी अभ्यासपूर्ण युक्तिवाद करून तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा वासनवाडी बीड येथील फिर्यादीचे खाते उतारा व सत्य परिस्थिती माननीय न्यायालयासमोर मांडली त्या अनुषंगाने न्यायाधीश महोदयांनी आरोपीचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला.

सद्य परिस्थितीत ऑनलाइन फसवणुकीचे अनेक प्रकार समोर येत असताना बीड शहरातील ज्येष्ठ नागरिकाच्या बँक खात्यातून त्याचे परस्पर ऑनलाईन पैसे हडप केल्यामुळे सदर गुन्ह्यातील आरोपीचा जामीन अर्ज फेटाळल्यामुळे भविष्यात अशा प्रकारची गैरकृत्ये करणाऱ्यांना आळा बसेल अशी आशा ठेवण्यास हरकत नाही अशी भावना या प्रकरणातील फिर्यादीने बोलून दाखवली आहे तसेच असा गुन्हा होऊ नये म्हणून नागरिकांनी सतर्क रहावे, व गुन्हा घडला तर तात्काळ पोलिसांशी व बँकेची संपर्क करावा अशी भावना फिर्यादीचे खाजगी विधीज्ञ एडवोकेट अनिल बारगजे यांनी व्यक्त केली आहे.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :