जुळ्या बहिणींशी लग्न करणारा ‘तो’ आधीच विवाहबध्द झालाय?

spot_img

सोलापुरातल्या रिंकी आणि पिंकी आयटी इंजिनिअर असलेल्या दोन्ही जुळ्या मुलींच्या संभाव्य सुखी संसाराच्या कहाणीला काहीसं वेगळं आणि धक्कादायक वळण लागलंय. या जुळ्या बहिणींशी लग्न करणारा मुंबईतला अतुल अवताडे यांचं यापूर्वी लग्न झालेलं आहे. त्याच्या पत्नीनं याप्रकरणी महिला आयोगाकडे तक्रार दिलीय.

लग्न हा मानवी आयुष्यातला महत्वाचा टप्पा मानला जातो. अनेक संस्कारांपैकी हा एक महत्वाचा संस्कार. या संस्कारानुसार लग्न केलेल्या जोडप्यांना प्रजोत्पादन करण्याची अधिकृत संधी मिळते. ब्रम्हचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास असे चार आश्रम आपल्या वैदिक संस्कृतीने निर्माण केलेले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातल्या पिंकी मिलिंद पाडगावकर आणि रिंकी मिलिंद पाडगावकर या जुळ्या बहिणी एकमेकींपासून कधीही अलिप्त किंवा वेगळ्या राहिलेल्या नाहीत. भावी आयुष्यातही एकत्र राहण्याचा या दोघींनी निर्धार केला. यासाठी मुंबईत ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करणार्‍या अतुल अवताडे या तरुणाशी लग्न करण्याचा या दोघींनी निर्णय घेतला. अतुल हा माळशिरस तालुक्यातल्या महाळुंग येथील मूळ रहिवासी आहे.

दरम्यान, या दोघी जुळ्या बहिणींसह त्यांच्या आईला अतुलनं मदत केली. त्यामुळे त्या दोघींनी त्याच्याबरोबरच सुखी संसाराची स्वप्नं पूर्ण करायचं ठरवलं. पण आपलं याआधी लग्न झाल्याचं अतुलनं या दोघींपासून लपवून ठेवलं.

भारतात पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतल्याशिवाय दुसरं लग्न करता येत नाही, असा कायदा आहे. रिंकी आणि पिंकी या दोघी जुळ्या बहिणींशी अतुलनं लग्न केलं. या लग्नाचे फोटो सोशल मिडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाले. या लग्नाची मोठी चर्चा झाली.

या लग्नाची महिला आयोगानं गंभीर दखल घेतली. कसून चौकशी केल्यानंतर अतुलचं खरं रुप या दोघी जुळ्या बहिणींसमोर आलं. दरम्यान, रिंकी आणि पिंकी या जुळ्या बहिणींविरुध्दही गुन्हा दाखल होणार आहे. त्यामुळे अतुल आणि या दोन्ही बहिणींच्या हातांत लग्नाच्या बेडीऐवजी पोलिसांची बेडी पडणार आहेत.

लग्न हा ज्याचा त्याचा वैयक्तिक विषय आहे. मात्र ज्याच्याबरोबर एखादी मुलगी लग्न करणार असते, त्या मुलाची संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय लग्नाचा हा निर्णय योग्य नाही. यासाठी मुला – मुलींचे आईवडील आणि अन्य नातेवाईक अनेक स्थळं पाहतात. कारण हा मुला – मुलींच्या आयुष्याचा प्रश्न असतो.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :