जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादीतच राहणार ; या चर्चा थांबवा ; अजित पवार यांचं पत्रकार परिषदेद्वारे आवाहन ! 

spot_img

जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादीतच राहणार ; या चर्चा थांबवा ; अजित पवार यांचं पत्रकार परिषदेद्वारे आवाहन ! 

माझ्या आणि माझ्या सहकाऱ्यांबद्दल विनाकारण गैरसमज पसरवला जात आहेत. जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. या बातम्यांमध्ये कोणतंच तथ्य नाही, असं म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांच्या भाजप प्रवेशाबाबतच्या चर्चांवर स्पष्टीकरण दिलंय. जोपर्यंत जीवात जीव आहे, तोपर्यंत पक्षासोबत राहाणार. या चर्चा थांबवा, तुकडा पाडा, असं म्हणत अजित पवारांनी या चर्चांना पूर्णविराम दिलाय. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेद्वारे पवार यांनी एकप्रकारे हे आवाहन केलंय.

ते म्हणाले, पूर्ण आमदारांच्या सह्या घेण्याचं कारण नाही. आम्ही राष्ट्रवादीचे आमदार आहोत, राष्ट्रवादीतच राहणार आहोत. मी नेहमीप्रमाणे माझ्या ऑफिसमध्ये बसतो, अनेक जण कामानिमित्त येत असतात. नेहमीप्रमाणे आमदार मला भेटायला आले. त्यात वेगळा अर्थ काढू नका’.

प्रत्येक मंगळवारी आमदार मला भेटतात, हे नेहमीचे आहे. अनेक आमदारांचं काम होतं म्हणून आले होते, त्याचा वेगळा अर्थ काढू नका

आमदारांबाबत चुकीच्या बातम्या देऊ नका कारण संभ्रम निर्माण होतं आहे. राष्ट्रवादी काँगेस पक्षात चढउतार आले आहेत. आम्ही तिथच राहणार आहोत.

सध्या निर्माण झालेल्या प्रश्नांवरुन लक्ष विचलित करण्यासाठी हा प्रकार सुरु आहे.

माणसाच्या जीवाशी हे का खेळले याचं उत्तर द्यावं. राजभवनला हॉलमध्ये हा सोहळा घेता आला असता. मात्र यांना निष्काळजीपणा नडला आहे.

राजकारण्यांना राजकारण साधायचं होत का? सरकारने या प्रकरणी संवेदनशीलता दाखवली नाही.

अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) 53 पैकी 40 आमदारांच्या सह्या घेतल्याचं वृत्त समोर आलं होतं. सह्या मिळवण्यासाठी अजित पवार राष्ट्रवादीच्या आमदारांना फोन करत आहेत, असंही या वृत्तात म्हटलं आहे. शिवाय यंदा शरद पवार हे सगळं थांबवण्याचा प्रयत्न करत नाहीत, असंही या वृत्तात म्हटलं आहे.

2019 साली अजित पवार यांचं बंड शरद पवार यांच्यामुळेच फसलं होतं. कारण अजित पवारांसोबत गेलेल्या सर्व आमदारांना थोरल्या पवारांनी स्वतः फोन केले होते. मात्र यंदा तसं काहीही होताना दिसत नाही. परंतु अजित पवार यांनी हे वृत्त फेटाळलं आहे. “नव्या समीकरणांच्या फक्त चर्चा आहेत. यात काही तथ्या नाही. मी पुन्हा पुन्हा प्रतिक्रिया देणार नाही, मिडिया स्वतःच्या मनाने बातम्या चालवत आहे, असंही अजित पवार म्हणाले.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :