जिल्हा पोलीस क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनलचा दणदणीत विजय !

spot_img

जिल्हा पोलीस क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनलचा दणदणीत विजय!…

पोलीस कॉन्स्टेबल रेवनाथ दहिफळे यांच्या हाती सोसायटीची निर्विवाद सत्ता! IMG 20230409 WA0114 जिल्हा पोलीस क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीसाठी आज रविवार दि. 9 एप्रिल रोजी सकाळी मतदान झाले आणि संध्याकाळी मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत पोलीस कॉन्स्टेबल दहिफळे यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनलचा दणदणीत विजय झाला. Screenshot 2023 04 09 19 16 06 44 7352322957d4404136654ef4adb64504 या निवडणुकीच्या माध्यमातून जिल्हा पोलीस क्रेडिट सोसायटीची सत्ता पोलीस कॉन्स्टेबल दहिफळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हाती निर्विवादपणे आली. या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांनी सोसायटीच्या सभासदांचा विश्वास संपादन केला.

सोसायटीचा कारभार ऑनलाईन पद्धतीने करण्यासह कर्ज मर्यादा वाढवण्यात आली. तसेच कर्ज मंजुरीचा कालावधीदेखील कमीत कमी करण्याचं अभिवचन परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांनी दिलं होतं.

जिल्हा पोलीस क्रेडिट सोसायटीतर्फे देण्यात येणाऱ्या कर्जाला विमा संरक्षण देण्यासह जामीनदाराला टेंशन मुक्त करण्याचे अभिवचनदेखील परिवर्तन पॅनेलच्या उमेदवारांनी दिलं होतं. यावर सोसायटीच्या सभासदांनी विश्वास ठेवला आणि परिवर्तन पॅनलचा दणदणीत विजय झाला.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :