जाणून घ्या ‘हा’ आरोग्यमंत्र ! ‘या’ ड्रिंक्समुळे तुम्ही वजन कमी करु शकता !

spot_img

जाणून घ्या ‘हा’ आरोग्यमंत्र ! ‘या’ ड्रिंक्समुळे तुम्ही वजन कमी करु शकता !

हल्ली शरीराच्या वाढत्या वजनाच्या समस्या फारच कठीण आणि गंभीर बनल्या आहेत. शरीराचे वजन कमी करण्यासाठी अनेक जण वेगवेगळे उपाय आणि शारीरिक कसरतीदेखील करत आहेत. यामुळे वजन कमी होत असलं तरी आणखी काही वेगळे अपाय होण्याची शक्यता डॉक्टर मंडळी व्यक्त करत आहेत. मात्र तुम्ही काही ड्रिंक्स म्हणजे थंडगार पेय घेतल्याने तुमच्या शरीराचे वजन कमी होऊ शकतं. ते कसं शक्य आहे, हे या लेखात तुम्ही जाणून घेऊ शकता.

या लेखात काही ड्रिंक्सबाबत सांगितले आहे, ज्यामुळे शरिरातल्या कॅलरीज कमी होतात. हे ड्रिंक्स हेल्दी आणि स्वादिष्टही असतात. याशिवाट पॅकेज्ड, कार्बोनेट ड्रिंक्सच्या तुलनेत हे खूपच फायदेशीर आहेत.

नारळाच्या पाण्यात पोटॅशियम, उच्च बायोएक्टिव्ह एंजाईम्स असतात. ज्यामुळे मेटाबॉलिझ्म सुधारण्यास मदत होते. यामुळे मांसपेशी अधिक कॅलरीज बर्न करू शकतात. यासाठी दिवसभरातून अनेकदा नारळ पाणी प्यायल्यानं शरीर तंदरूस्त राहण्यास मदत होते आणि वजनही नियंत्रणात राहतं.

यात वर्कआउटनंतरच्या हायड्रेशनसाठी आवश्यक असलेली महत्त्वपूर्ण खनिजेदेखील असतात. या खनिजांमध्ये कॅल्शियम, तांबे, मॅग्नेशियम, मॅंगनीज, जस्त, लोह आणि पोटॅशियम यांचा समावेश आहे. त्यामुळे ऊसाचा रस हा कृत्रिम एनर्जी ड्रिंक्स आणि पोस्ट वर्कआउट एनर्जी बारसाठी उत्कृष्ट पर्याय आहे. ऊसाचा रस आरोग्यदायी फायदे देतो. यामुळे तुम्हाला जास्त काळ पोट भरल्यासारखे वाटते, तुमचे क्रेव्हिंग्स कमी होतात.

पुदीन्याची पानं वजन कमी करण्यात महत्वाची भूमिका बजावतात. पुदिन्यामुळे पचनाच्या समस्या दूर होतात. वजन कमी करण्यासाठी आणि चयापचन वाढवण्यासाठी पुदीन्याचं पाणी उत्तम उपाय आहे. पुदीन्याचा चहा वजन कमी करण्यासाठी एक उत्तम उपाय आहे. यामुळे कॅलरीज कमी करण्यात मदत होते.

दुपारच्या जेवणानंतर अनेकांना ताक लागतंच. ताक प्रथिने, जीवनसत्त्वे आणि अनेक खनिजांनी समृद्ध आहे परंतु कॅलरी आणि चरबी कमी आहे. ताक प्यायल्याने आपण हायड्रेटेड आणि ऊर्जावान राहतो. यामुळे आपल्याला पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे जंक फूडचे अनावश्यक सेवन कमी केले जाते. ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी हे एक उत्तम पेय आहे.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :