चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट ; मंत्री शंभूराजे देसाई यांनी लगावला टोला ! 

spot_img

चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट ; मंत्री शंभूराजे देसाई यांनी लगावला टोला ! 

कर्नाटकच्या विजयश्रीनंतर काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. कालच्या रविवारी शरद पवार यांच्या सिल्वर ओक या नवीदिल्लीतल्या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. मात्र या बैठकीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नाना पटोले यांच्यासह अनेक नेत्यांसमवेत एका सोफ्यावर बसले होते.

या प्रसंगाचं औचित्य साधून शिंदे गटाचे आमदार शंभूराजे देसाई यांनी असे एक निरीक्षण नोंदवले आहे, की संख्याबळ घटल्याने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मानसन्मान गेला. तसंच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करताना ते चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट आहे, असा टोलादेखील आ. देसाई यांनी लगावला.

महाविकास आघाडीच्या वज्रमूठ या सभेच्या वेळी देखील असाच काहीसा किस्सा झाला होता. त्यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वेगळी खुर्ऊ देण्यात आली होती. त्यावरूनदेखील उलट सुलट चर्चा करण्यात आल्या होत्या. दरम्यान पाठीचा त्रास होत असल्याने असं करण्यात आल्याचं माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यावेळी स्पष्टीकरण दिलं होतं

महाराष्ट्र राज्यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये नेहमीच टोलेबाजी सुरू असते, आरोप प्रत्यारोप सुरू असतात. हे काही केल्या थांबायला तयार नाही. मात्र यामुळे सामान्य जनतेचे जे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांकडे सत्ताधाऱ्यांचं दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे. सक्षम विरोधी पक्षाच्या नेतृत्वाने सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवायला हवा. जनतेच्या विशेषतः शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात सत्ताधाऱ्यांना अक्षरशः धारेवर धरायला हवं. मात्र असं होताना दिसत नाही, ही मोठी या राज्यातल्या जनतेची शोकांतिका आहे.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :