चला, प्रतिक्षा संपलीय ! अखेर ‘ती’ येणार 23 जानेवारीला ! कशी दिसत असेल ना ती ?
बाईकचं वेड असणार्या आजच्या तरुणाईची प्रतिक्षा अखेर संपलीय. येत्या दि. 23 जानेवारीला होंडा ॲक्टिव्हा स्मार्ट Honda Activa Smart ही दुचाकी नव्या रंगात आणि नव्या ढंगात लाँच होणार आहे. कंपनीनं या दुचाकीविषयी फारशी सविस्तर माहिती दिलेली नाही. मात्र तरुणाईची ही लाडकी बाईक कशी दिसते, याची अनेकांनाच मोठी उत्सुकता लागलेली आहे.
तरुणांमध्ये ॲक्टिव्हाची चांगलीच क्रेझ आहे. नवी होंडा ॲक्टिव्हा स्मार्ट ही सध्याच्या ॲक्टिव्हा स्टँडर्ड आणि डीएलएक्सपेक्षा 1 किलो वजनानं कमी आहे. सध्या बाजारात असलेल्या बाईकच्या व्हेरिएंटमध्ये बसविलेले इंजिन 7.79 पाॅवर जनरेट करते.
दरम्यान, नवीन बाईकमध्ये 7.84 ची पाॅवर उपलब्ध आहे. या स्कुटरच्या नावात स्मार्ट हा शब्द ॲंटी थेप्ट सिस्टिमसाठी असू शकतो. ही सिस्टिम या नव्या स्कुटरमध्ये असू शकते.
ही होंडा इग्निशन सिक्युरिटी सिस्टीम किंवा H.I.S.S ची परवडणारा व्हर्जन असू असतो. जी कंपनीच्या महागड्या बाईकमध्ये आढळते. या नवीन अँटी थेफ्ट सिस्टमने सुसज्ज असलेली ही स्कूटर शाईन सारख्या होंडा बाईकच्या रांगेत सामील होऊ शकते.
ही नवीन होंडा स्मार्ट ॲक्टिव्हा ही स्कूटर टीव्हीएस ज्युपिटरशी स्पर्धा करणार आहे. हिची प्रारंभिक किंमत 73 हजार 097 रुपये आहे आणि या स्कुटरच टॉप मॉडेल 87 हजार 923 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध आहे.
ही स्कूटर 6 प्रकारांत आणि 16 रंगांच्या पर्यायात बाजारात उपलब्ध आहे. टीव्हीएस ज्युपिटरमध्ये 109.7cc BS6 इंजिन आहे, जे 7.77 bhp पॉवर आणि 8.8 Nm टॉर्क जनरेट करू शकते.
या नव्या स्कुटरला पुढील आणि मागील दोन्ही चाकांवर ड्रम ब्रेकसह एकत्रित ब्रेकिंग सिस्टम मिळते. या स्कूटरचे वजन 107 किलो आहे आणि याची इंधन टाकी क्षमता 6 लिटर आहे.