घ्या आता ! ७८ वर्षीय ‘या’ आजीबाईनं चक्क बँकेवर दरोडा टाकलाय !

spot_img

घ्या आता ! ७८ वर्षीय ‘या’ आजीबाईनं चक्क बँकेवर दरोडा टाकलाय !

 

आपल्याकडे माणसं साठीनंतर निवृत्त होतात. कारण वाढत्या वयामुळे त्यांना शरीर साथ देत नसतं. मात्र 78 वर्षे वय असलेल्या एका आजीबाईनं चक्क बँकेवर दरोडा टाकला, असं जर तुम्हाला कोणी सांगितलं, तर तुम्ही हसाल. कारण तुम्हाला पटणार नाही. मात्र हे वास्तव आहे‌ या आजीबाईबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.

या 78 वर्षांच्या आजीबाईचे नाव बोनी गूच आहे. या आजीबाई मिसुरीतल्या गोप्पर्ट फायनान्शियल बॅंकेत गेल्या. काळ्या रंगाचे मास्क, काळ्या रंगाचा चष्मा आणि प्लास्टिकचे ग्लोव्हज अशा अवतारात या आजीबाई बॅंकेत शिरल्या. त्यांनी कॅशिअरला एक चिठ्ठी दिली. त्यावर लिहिलं होतं मला हजारो डॉलर्स हवे आहेत. विशेष म्हणजे या आजीबाईंना याआधी दोनदा बॅंकेवर दरोडा टाकण्याप्रकरणी शिक्षा झाली आहे. हा त्यांचा तिसरा दरोडा होता. या आजीबाईंना अटक करण्यात आली असून आता त्यांचा मुक्काम तुरुंगात आहे.

जेव्हा पोलिसांनी तपास केला तर त्यांना कळलं की गूच यांनी जी चिठ्ठी दिली होती त्यावर लिहिलं होतं, ‘आय नीड 13,000 स्मॉल बिल्स.’ जेव्हा गूच बॅंकेत शिरल्या त्यांनी आरडा ओरडा केला. लवकरात लवकर कॅश मिळावी म्हणून त्यांनी काउंटरवर बुक्कीदेखील मारली.

त्यांचा हा दरोडा सुरू असताना पोलिसांना एक कॉल गेला आणि त्यांनी सांगितले की बॅंकेत दरोडा सुरू आहे. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. तोपर्यंत गूच पसार झाल्या होत्या.

पोलिसांनी त्यांना शोधलं. त्यांना पकडण्यासाठी फार वेळ लागला नाही. पण जेव्हा पोलिसांनी त्यांना पहिल्यांदा पाहिलं तेव्हा तेच गोंधळले. त्यांचा विश्वासच बसला नाही. एक 78 वर्षांची महिला कारमध्ये बसलेली होती. गूच यांनी दारु घेतल्याचं पोलिसांना वाटलं. कार सीटवर आणि सीटखाली बॅंकेच्या दरोड्यातून लुटलेली कॅश पडलेली होती.

बॅंकेचा दरोडा टाकण्याची गूच यांची ही काही पहिलीच वेळ नव्हती. यापूर्वी 1977 साली कॅलिफोर्नियात दरोडा टाकल्यानंतर आणि 2020 साली आणखी एका बँक दरोड्यानंतर गूच यांना दोषी ठरवण्यात आलं होतं. यावेळी गूच यांनी कॅशिअरकडे बर्थडे कार्ड सोपवला होता, त्यावर लिहिलं होतं की, ‘हा दरोडा आहे’.

नोव्हेंबर 2021 मध्येच 2020 मधील दरोड्याची शिक्षा संपली होती. गूच यांना कुठलाही मानसिक आजार नसल्याचं समोर आलंय. मात्र, त्यांचं वय पाहता आणखी कोणता आजार आहे का, ज्यामुळे त्या दरोडे टाकत आहेत, याची तपासणी पोलीस करत आहेत.

आपल्या देशात मात्र या वयात महिला पूजा पाठ करतात. कीर्तन, प्रवचनं ऐकतात. अमेरिकेत मात्र हे असं भलतं सलतं सुरू असतं. काय तर म्हणे सुधारलेला देश, पुढारलेला देश. या पुढारलेल्या आणि सुधारलेल्या देशात जर अशी ‘थेरं’ चालत असतील तर त्यापेक्षा आपला देशच बरा. निदान आपल्या देशात संस्कृती, धर्म, नीतिमत्ता महिलांच्या विचारांमध्ये आज तरी टिकून आहे.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :