‘घर पहावं बांधून’ हे आपल्या पूर्वजांनी म्हटलंय, ते काही खोटं नाही. स्वत:च्या हिंमतीवर घर बांधायचे दिवस आता राहिले नाहीत. कारण वाढत्या महागाईमुळे बांधकाम साहित्याचे Bulding Materiar दर Rate गगणाला भिडले आहेत.
अशा परिस्थितीत एखाद्यानं गृह कर्ज Home Loan घेतलं असेल तर हप्ते भरता भरता त्याला नाकीनऊ येतात. मात्र घर घेताना डाऊन पेमेंट जास्त भरलं तर हप्ता मासिक कमी बसतो.
तुम्ही १५ वर्षांसाठी वार्षिक ६.७५ व्याज दराने २५ लाख रुपयांचे कर्ज घेतले. या प्रकरणात, त्याची ईएमआय २२ हजार १२३ रुपये येईल आणि तुम्हाला संपूर्ण कार्यकाळात १४,लाख ८२ हजार ०९२ रुपये व्याज द्यावे लागेल. तर, जर तुम्ही कर्जाची मुदत २५ वर्षे केली तर ईएमआय १७ हजार २७३ रुपयांपर्यंत खाली येईल. परंतु, तुम्हाला कर्जाच्या कालावधीत २६ लाख ८१ हजार ८३८ रुपये व्याज द्यावे लागेल.
म्हणून जेव्हाही तुम्ही गृहकर्ज घेता तेव्हा डाउन पेमेंट शक्य तितक्या जास्त करण्याचा प्रयत्न करा. कारण १-२ लाख रुपयांचे जास्त डाउन पेमेंट सुद्धा तुमचा EMI २-३ हजार रुपयांनी कमी करू शकते. याशिवाय व्याजाचीही बचत होते.
तुम्ही १५ वर्षांसाठी २५ लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे, ज्याचा व्याज दर ६.७५ टक्के आहे.
तुमचा EMI २२ हजार १२३ रुपयांवर येईल. दुसरीकडे, जर तुम्ही २ लाख रुपयांचे अधिक डाउन पेमेंट केले असेल म्हणजेच २३ लाखांचे कर्ज घेतले असेल, तर हा EMI सुमारे २० हजार ३५३ रुपयांपर्यंत खाली येईल. म्हणजेच मासिक हप्ता सुमारे २ हजार रुपयांनी कमी झाला.
संपूर्ण कर्जाच्या कालावधीत व्याजाच्या रकमेत सुमारे १.१८ लाख रुपयांचा फायदा होईल. अनेक वेळा असं होतं, की गृहकर्जाच्या EMI मुळे मासिक खर्चावर परिणाम होतो. अशा परिस्थितीत, जर अतिरिक्त उत्पन्न किंवा बचत उपलब्ध नसेल, तर तुम्ही कर्जाचा कालावधी वाढवून EMI कमी करू शकता. पण, यात एक तोटा असेल की तुम्हाला जास्त व्याज द्यावे लागेल.
एका बँकेकडून गृहकर्ज घेतले आहे, परंतू दुसऱ्या बँकेचा व्याजदर कमी आहे. तर तुम्ही कर्ज हस्तांतरित करू शकता. जर तुम्ही 0.50 टक्के कमी व्याजाने कर्ज हस्तांतरित केले असेल तर तुम्हाला कमी EMI सोबत कमी व्याज द्यावे लागेल.