‘घरातलं फर्निचर विकायचंय, स्वस्तात देतो, 85 हजार रुपये पाठवा’, असं म्हणत ‘त्या’ भामट्याने महिलेला फसवलं !
फेसबुक फ्रेंडची ओळख सांगून एकाने संपर्क करुन फर्निचर स्वस्तात विकायचे असल्याचे सांगितले. फर्निचर व दुचाकी घेऊन येत असल्याचे सांगून महिलेला ८५ हजार रुपयांना गंडा घातला. फेसबुक फ्रेंडने आपले फेसबुक हॅक झाल्याचे सांगून अशा कोणाला ओळखत नसल्याचे सांगितल्यावर महिलेला आपली फसवणूक (Cheating Case) झाल्याचे लक्षात आले. (Pune Crime News)
याबाबत वडगाव बुद्रुक येथे राहणार्या एका ४५ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी या लोणीकंद येथे सामाजिक काम करीत असताना त्यांची प्रताप मानकर यांच्याशी ओळख झाली. त्यांच्याशी फेसबुक फ्रेंड (Facebook Friend) आहे. त्यांच्यात व्हॉट्सॲपवर मेसेज (WhatsApp Message) येत होते. त्यांना एके दिवशी अचानक प्रताप मानकर यांची पुन्हा फ्रेंड रिक्वेस्ट आली.
संबंधिताने मोबाईल क्रमांक मागवून घेतला. त्यानंतर त्याने आपण प्रताप मानकर यांचा मित्र अशिषकुमार असून ए सी आर पी एफचा जवान आहे. त्याची जम्मूला बदली झाली असून घरातील फर्निचर विक्री करायचे असल्याचे व ते खूप स्वस्तात देत आहेत, असे सांगितले. फिर्यादी यांनी मानकर सरांना फोन करु का असा मेसेसद्वारे विचारल्यावर मी कामात व्यस्त आहेत.
मी कामातून रिकामा झालो की फोन करतो. तो माझ्या मित्र तुला व्हॉट्सॲपवर संपर्क करेल, असा मेसेज केला. काही मिनिटांनंतर त्यांना व्हॉट्सॲप कॉल आला. त्यांनी फर्निचरचे फोटो टाकले. त्यांना फर्निचर पसंत पडले. तेव्हा त्याने सामान घेऊन ट्रक पाठवितो. ८५ हजार रुपये पाठवा, असे सांगितले.
त्यावर विश्वास ठेवून मानकर यांच्याशी संपर्क न करता व माल आला नसतानाही त्यांनी संबंधितांना ८५ हजार रुपये पाठविले. आशिषकुमार याने पाठविलेल्या फर्निचर व स्कुटीची वाट पाहत होते. परंतु, सामान काही आले नाही.
दुसर्या दिवशी मानकर यांना फोन करुन या प्रकाराची माहिती दिल्यावर त्यांनी आपले फेसबुक हॅक झाल्याचे
तसेच कोणत्याही आशिषकुमार याला ओळखत नसल्याचे सांगितले.
आपली फसवणूक (Fraud Case) झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी सायबर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली.