गोवंशीय जनावरांची वाहतूक करणारा टेम्पो कोतवाली पोलिसांच्या ताब्यात ! 

spot_img

गोवंशीय जनावरांची वाहतूक करणारा टेम्पो कोतवाली पोलिसांच्या ताब्यात ! 

दि.०८/०४/२०२३ रोजी रात्री ०९.४५ वाजण्याचे सुमारास कोतवाली पोलीसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, अहमदनगर शहरातून एक पांढ-या रंगाचा टेम्पो केडगावमार्गे पुण्याचे दिशेने जात असून त्यामध्ये गोवंशीय जनावरांची बेकायदेशीर वाहतुक होत आहे. या माहितीनुसार पोनि चंद्रशेखर यादव यांनी रात्रगस्तीवर असलेले सपोनि रविंद्र पिंगळे, पोकां/पोपट देव्हारे, पोकॉ अशोक कांबळे, पोकों गालफाडे, होमगार्ड पाटसकर यांना सदरबाबत माहिती कळवून खात्री करून कारवाई करणेबाबत सूचना दिल्या. त्याप्रमाणे सपोनि पिंगळे यांनी पथकासह केडगांव येथील रंगोली हॉटेलजवळ सापळा लावून खबरी प्रमाणे एका पांढ-या रंगाच्या टेम्पोचा शोध घेतला.

काही वेळाने एक पांढ-या रंगाचा टेम्पो क्र. एमएच १२ क्यु जे ५१४१ हा संशयितरित्या जात असल्याचे निदर्शनास आला. सपोनि पिंगळे व पथकाने सदर टेम्पोस थांबवुन टेम्पोमध्ये एकुन चार इसम बसलेले मिळून आली. त्यांना त्यांची नावे १) सागर दिपक आगळे २) विश्वास दिपक आगळे ३) संदिप रावसाहेब उमाप ४) जाकीर हमीद पठाण (सर्व रा.नेवासा जि. अहमदनगर) असे असल्याचे सांगितले. त्यांच्या ताब्यातील टेम्पो वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये दोन खिलारी बैल व एक वासरु असे एकूण ७०,०००/- रु किचे गोवंशीय जनावरे मिळून आली. त्या सर्वां त्यांचेविरुध्द कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हा ( रजि नं. ३३१ / २०२३ महाराष्ट्र प्राणी सरंक्षण अधिनियम १९९५ चे कलम ५(अ) (१), ११(१) (ड) प्रमाणे) पोकों/पोपट देव्हारे यांचे फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर गुन्हयाचा पुढील तपास पोनि चंद्रशेखर यादव यांचे मार्गदर्शनाखाली पोना योगेश कवाष्टे हे करत आहेत. दरम्यान, सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सपोनि रविंद्र पिंगळे, पोको पोपट देव्हारे, पोकों अशोक कांबळे, पोकों अशोक गालफाडे, होम/पाटसकर यांनी केली.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :