गुजरात, हिमाचलप्रदेचं इलेक्शन झालं ! आता पहा, पेट्रोल – डिझेलच्या दरांत काय मिळाला दिलासा!

spot_img

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्या तेलाचे दर 80 रुपये प्रति डाॅलर बॅरलपेक्षाही कमी आहेत. ब्रेंट कूड आॅईलचा दर 76.98 इतका आहे. तर WTI क्रूड आॅईलचा दर 72.36 डाॅलर प्रति बॅरल इतका आहे. गेल्या आठवड्यातल्या गुरुवारच्या तुलनेत कच्च्या तेलाचे दर वधारले आहेत. दरम्यान, भारतातल्या इंधन दरांत कंपन्यांनी प्रतिलिटर 80 पैशांनी वाढ केली होती.

(बातमी संदर्भात आपल्या कॉमेंट्स आम्हाला 9890006212 या whatsapp नंबर वर पाठवू शकता)

केंद्र सरकारनं 22 मे रोजी उत्पादन शुल्कात वाढ केली होती. त्यामुळे पेट्रोल – डिझेलचे दर कमी झाले होते. जूलै महिन्यात महाराष्ट्र सरकारने इंधन दरावरच्या व्हॅटमध्ये कपात केली होती. त्यानंतर इंधन कंपन्या आणि केंद्र सरकारनं देशवासियांना कोणताही दिलासा दिला नाही.

नवीदिल्लीमध्ये पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर या दरानं मिळतंय. कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा 92.76 रुपये प्रति लिटर या दरानं उपलब्ध आहे. चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर या दरानं मिळतंय. तर मुंबईत पेट्रोल
106 . 31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94 . 27 रुपये प्रति लिटर या दरानं उलब्ध आहे.

पेट्रोल आणि डिझेल ही सर्वसामान्यांची मुलभूत गरज बनली आहे. मात्र इंधनवाढीचा वेगात धावणारा वारु काहीसा स्थिरावल्यानं सर्वसामान्यांमध्ये सध्या समाधान व्यक्त होत आहे. मात्र इंधनाचे दर आणखी कमी होण्याची सामान्यांची अपेक्षा आहे. कारण केंद्रात आणि राज्यात एकाच विचारांचं सरकार आहे. त्यामुळे इंधनावरचा व्हॅट आणखी कमी झाला तर पेट्रोल आणि डिझेलचे आणखी कमी होतील. मात्र शिंदे – भाजप सरकारनं तातडीनं हा निर्णय घ्यावा, अशी मागणी सामान्य जनतेतून होत आहे.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :