गहू नि पिठाचे दर कमी होणार..? मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत..
गेल्या चार महिन्यांत गव्हाच्या किंमतीत किलोमागे चार रुपयांनी वाढ झालीय, तर गव्हाचे पीठ वर्षभरात 17-20 टक्क्यांनी महागले आहे. गव्हाच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
कशामुळे वाढले गव्हाचे दर..?
रशिया व युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात गहू उत्पादन होते. मात्र, या दोन देशातील युद्धामुळे गव्हाच्या किमतीवर झाला आहे. भारतात गव्हाचा तुटवडा जाणवण्याची शक्यता असल्याने केंद्र सरकारने या वर्षी मे महिन्यात गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली होती.
सध्या भारतात गव्हाच्या किंमती 3000 रुपये क्विंटलच्या आसपास असून, त्या कमी करण्यासाठी केंद्र सरकार खुल्या बाजारात गहू विकण्याची तयारी करीत आहे. भारतीय अन्न महामंडळ लवकरच तशी घोषणा करण्याची शक्यता आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना बंद झाल्यानंतर सरकारसमोर अनेक पर्याय खुले आहेत. 1 एप्रिलपर्यंत केंद्र सरकारकडे 113 लाख टन गव्हाचा साठा असेल. त्यामुळे सरकार छोट्या व्यापाऱ्यांना 2250 रुपये क्विंटल दराने 20 लाख मेट्रिक टन गहू विकू शकते.