गंगापूर नेवरगाव भागात अवैध वाळूउपसा सुरूच अधिकाऱ्यांचे मात्र अर्थपूर्ण दुर्लक्ष..!

spot_img

महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील झाल्यापासून राज्यात वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहे व बरेच ठिकाणी वाळू उपसा करणाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.

परंतु याला अपवाद औरंगाबाद मधील गंगापूर तालुक्यातील नेवरगाव भागात रात्रंदिवस वाळू उपसा करून वाळूचोरी चालू आहे. तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यांचे सहकार्याने रात्र आणि दिवस ट्रॅक्टर, क्रेन, जेसीबी मशिंनच्या सहाय्याने हजारो ब्रास वाळू उपसा दररोज चालू आहे.

संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून सूचना देऊन कारवाई होत नाही. हे अधिकारी वाळु तस्करांच्या ताटाखालचे मांजर झाले आहे. स्थानिक ग्रामस्थांनी राज्याचे महसूल मंत्री विखे पाटील यांना निवेदन दिले आहे.

तरी तलाठी, मंडल अधिकारी व तहसीलदार यांच्यावर कारवाई करावी अशी ग्रामस्थांच्या वतीने मागणी करण्यात आली.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :