खासदार संजय राऊत यांच्यावर पुन्हा हक्क भंग प्रस्ताव ; आमदार संजय शिरसाठ यांची मागणी ! 

spot_img

खासदार संजय राऊत यांच्यावर पुन्हा हक्क भंग प्रस्ताव ; आमदार संजय शिरसाठ यांची मागणी ! 

ठाकरे गटाच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे विधानसभा अध्यक्षांवर दबाव आणत आहेत. 16 आमदारांना लवकरात लवकर अपात्र करा, अशी मागणी करून खासदार राऊत हे अध्यक्षांवर दबाव आणत असल्यामुळे त्यांचे विरोधात पुन्हा एकदा हक्क भंग प्रस्ताव आणावा, अशी मागणी आमदार संजय शिरसाठ यांनी केली आहे.

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिलेल्या पत्रात आमदार संजय शिरसाठ यांनी म्हटले आहे, की खासदार संजय राऊत हे बेताल वक्तव्य करत आहेत. ते विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत वादग्रस्त वक्तव्य करीत आहेत.

हे सरकार घटनाबाह्य असल्याचे खासदार राऊत यांनी म्हटले आहे. विधानसभा अध्यक्षांना घटना, कार्यपद्धती, नियम आणि संसदीय परंपरा यांच्या अंतर्गत अधिकार आहेत. कायदे मंडळाचे अध्यक्ष या नात्याने विधानसभा अध्यक्ष हे न्यायाधीशांच्या भूमिकेत असतात. अध्यक्षांच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयदेखील आव्हान दिले जाऊ शकत नाही.

अशा परिस्थितीत खासदार राऊत यांच्याकडून अध्यक्षांवर बेछूट आरोप होत आहेत. विधिमंडळाच्या कार्यक्रमातील विधानसभा अध्यक्ष हे कोणत्याही एका पक्षाचे नेतृत्व करत नाहीत. विधिमंडळातल्या सर्वच पक्षांचे ते पीठासन अधिकारी असतात.

विधानसभा अध्यक्षांवर केले जाणारे आरोप हे त्यांना धमकावण्यासाठी केले जात आहेत. विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारांवर गदा आणण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे खासदार राऊत त्यांच्या विरोधात हक्क भंग प्रस्ताव आणला जावा, अशी मागणी आमदार शिरसाठ यांनी केली आहे.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :