नगरच्या इंपिरियल चौकात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यासमोर हजारोंच्या संख्येनं हिंदूधर्मियांनी प्रचंड गर्दी केली. अत्यंत शिस्तबध्द वातावरणात याठिकाणी पुरुष आणि महिला कार्यकर्त्यांनी एकत्र येत श्रध्दा वालकरच्या निर्दयी हत्येचा निषेध नोंदविला.
एका अर्थानं श्रध्दा वालकरचा हत्यारा असलेला नीच, नराधम आणि क्रूरकर्मा असलेल्या आफताब पुनावालाच्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या विरुध्द अहमदनगरमध्ये आज मोठ्या संख्येनं भगवा एकवटल्याचं दिसून आलं.
दरम्यान, या क्रूरकर्मा आफताबची नार्को चाचणी करण्याचे आदेशदेखील न्यायालयानं दिले आहेत. मृत श्रध्दाच्या काही सहकार्यांनी यापूर्वीच सांगितलं, की आफताब हा सुरुवातीपासूनच श्रध्दाचं शारिरीक मानसिक आणि लैंगिक शोषण करत होता.
आफताब ही एक भरकटलेली नीच प्रवृत्ती आहे. त्यानं केलेली श्रध्दा वालकरची हत्या माणुसकीला कलंक तर आहेच. पण पुराणकाळातल्या राक्षसांनाही लाज वाटेल, असं कृत्य करणार्या आफताबला फाशीची शिक्षा व्हायला हवी, अशी मागणी नगरच्या या मोर्चा दरम्यान करण्यात आली.