क्रिकेट स्पर्धेत अंपायरनं ‘नो बॉल’ म्हटलं आणि तो प्राणाला मुकला ! 

spot_img

क्रिकेट स्पर्धेत अंपायरनं ‘नो बॉल’ म्हटलं आणि तो प्राणाला मुकला ! 

ओडिशामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील क्रिकेट मैदानाचे रणांगणात रूपांतर झाले. अंपायरला ‘नो बॉल’ देण्याचा निर्णय जीवाशी आला. एका तरुणाने धारदार चाकुने त्याची हत्या केली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिस घटनास्थळी पोहोचले असून एकाला अटक करण्यात आली आहे.

हे प्रकरण कटकमधील महिशिलंदा गावाशी संबंधित आहे. येथे क्रिकेटचा सामना सुरू होता. यादरम्यान अंपायरने ‘नो बॉल’चा निर्णय दिला. हा निर्णय आरोपीला अमान्य होता. म्हणून तो संतप्त झाला.

लकी राऊत (22, रा. महिशिलांदा) असे मृत तरुणाचे नाव आहे. आरोपीला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. स्मृती रंजन राऊत असे या आरोपीचं नाव आहे. महिसलंदा येथे ही स्पर्धा सुरू होती. ब्रह्मपूर आणि शंकरपूर हे दोन्ही संघ शेकडो प्रेक्षकांच्या उपस्थितीत सामना खेळत होते.

ब्रह्मपूर संघाविरुद्ध अंपायरने ‘नो बॉल’चा निर्णय दिल्याने वाद सुरू झाला. अंपायरने या निर्णयामुळे गावातील स्मृती रंजन राऊत नावाचा तरुण संतापला. त्याने पंचाशी वाद घालण्यास सुरुवात केली. हळूहळू वाद वाढत गेला. दरम्यान, स्मृती रंजन याने मैदानातच चाकू काढला आणि एकामागून एक त्याच्यावर चाकुने वार करु लागला.

या हल्ल्यात अंपायर गंभीर जखमी झाले. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले पण उपचारादरम्यान अंपायरला मृत घोषित केले. या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. यासोबतच गावात सुरक्षा दलाची तुकडी तैनात करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करून तपास सुरू केला आहे.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :