कोयता गँग ‘मुळशी पॅटर्न’चा सेकंड पार्ट?  गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडून काढण्यात पुणे पोलिसांना घवघवीत यश!

spot_img

कोयता गँग ‘मुळशी पॅटर्न’चा सेकंड पार्ट? गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडून काढण्यात पुणे पोलिसांना घवघवीत यश!  विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी प्रथमत: च विधानसभेत केला कोयता गँगचा उल्लेख!

मागच्या आठवड्यात हातात कोयता घेऊन दुकानदारांवर दहशत माजविणार्‍या दोघांपैकी एकाला पुणे पोलिसांनी Pune Police पाठलाग करुन पकडलं आणि गजबजलेल्या परिसरात प्रचंड चोप दिला. यानंतर ‘कोयता गँग’ Koyta Gang चर्चेत आली.

मात्र पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण जनतेला ‘कोयता गँग’चा परिचय आठ ते दहा वर्षांपासून होता. मात्र विरोधी पक्ष नेते अजित पवार Ajit Pawar यांनी विधानसभेत प्रथमत:च या गँगचा उल्लेख केला. खरं तर ही ‘कोयता गँग’ म्हणजे प्रसिध्द दिग्दर्शक आणि अभिनेता Directer & Acter प्रविण तरडेंच्या Prawin Tarade ‘मुळशी पॅटर्न’चा Mushi Patern सेकडं पार्ट म्हटलं जातंय.

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागांसह नवीनच वसाहत, व्यापारी संकुलं अस्तित्वात आलेल्या परिसरात या ‘कोयता गँग’ची प्रचंड दहशत होती. या गँगचे अनेक मोठे गुंड त्यांच्या आपसातल्या गुन्हेगारी कारवायांमुळे मारले गेले.

पुणे पोलिसांनी या गँगचे अनेक म्होरके जेलमध्ये डांबले. गँगचा लिडर जेलमध्ये गेल्यानं या गँगच्या बाकीच्या गुंडांनी परिसरात दहशत माजवायला सुरुवात केली. हे करत असताना या गँगच्या सदस्यांनी फक्त कोयता हेच हत्यार निवडलं.

‘कोयता गँग’च्या गुंडांनी त्यांचं शस्र पिस्तूल, तलवार असं न निवडता कोयताच का निवडलं, याचीही मोठी इंटरेस्टिंग स्टोरी आहे. या मागचं कारण हेच, की पिस्तूल, तलवार अशा शस्त्रांमुळे पोलीस आर्म ॲक्ट कायद्यान्वये गुन्हे दाखल करतात. त्यामुळे या गुंडांना लवकर बाहेर येता येत नाही.

यातली ही ‘ग्यानबाची मेख’ ओळखून या गँगनं दहशत निर्माण करण्यासाठी कोयता हेच शस्त्र निवडलं. दुसरं कारण असं, की कोयत्या हा सर्वसामान्य शेतकर्‍यांकडे असतो. शेतकर्‍यांचं शेतीचं साधन म्हणून कोयत्या सर्रास वापरला जातो. त्यामुळे एखाद्याच्या हातात कोयता आढळल्यास पोलिसांमाना आर्म ॲक्टनुसार कठोर कारवाई करता येत नाही.

पुण्याच्या हडपसर Hadapser भागात या ‘कोयता गँग’चा जूलै २०१३मध्ये जन्म झाला. याच दरम्यान प्रकाश गोंधळे यांची कोयत्यानं हत्या झाली. एका अर्थानं कोयता हे शस्त्र दहशत आणि धमकावणीच्या पुढे गेलं. यातून सुजित शर्मा, आकाश भापकर, बसवराज कांबळे यांचे खून झाले.

ही गँग ‘मास्टरमाईंड’ असलेल्या मोठ्या गुंडांमार्फत अल्पवयीन मुलांचा गैरवापर करुन आपला कार्यभाग उरकून घ्यायच्या. अशा अनेक गँगच्या गुंडांनी अल्पवयीन मुलांना गुन्हेगारीच्या क्षेत्रात आणलं. हातात कोयता असल्यानं लोकं घाबरतात, या नितीमत्तेतून व्यापार्‍यांना धमकावून दर महिन्याच्या हप्त्याचं गणित रुळलं.

‘कोयता गँग’ची दहशत वाढू लागल्यानंतर हडपसर पोलीस ठाण्याचे तत्कालिन पोलीस निरीक्षक सुनिल तांबे यांनी एक प्लॅन आखला. या गँगकडून कोयत्याचा वापर यासाठी केला जात होता, की यामुळे कमी आणि गंभीर नसलेली साधी साधी कलमं लागतील, गँगच्या सदस्यांना लवकर तुरुंगाबाहेर येता यावं, यासाठीच.

पोलीस निरीक्षक सुनिल तांबे यांनी कोयता वापरणार्‍यांविरुध्द गंभीर स्वरुपाचे गुन्हे स्वरुपाचे दाखल करायला सुरुवात केली. कोंबिंग ऑपरेशनद्वारे तांबे यांनी अनेकांविरुध्द कारवाई करायला सुरुवात केली. गंभीर गुन्हे दाखल केल्यामुळे गुन्हेगारांचे लवकर सुटायचे चान्सेस कमी झाले.

‘कोयता पॅटर्न’वर निर्बंध आणण्याचा प्रयत्न केला तो तत्कालिन पोलीस आयुक्त व्यंकटेशम् यांनी. कोयत्याच्या वापरावरच त्यांनी निर्बंध आणले. कोयता वापरण्यासाठी पोलिसांनी परवानगी आवश्यक असल्याचा नियम त्यांनी केला. मात्र हा काही ‘कोयता पॅटर्न’वरचा शंभर टक्के उपाय नव्हता.

सामान्य उऊस तोडणी मजुरांसह रस्त्यावर ठिकठिकाणी नारळ पाणी विकणार्‍यांकडून कोयत्याचा वापर केला जायचा. त्यामुळे कोयत्यावर पोलीस आयुक्तांच्या निर्बंधाला ठिकठिकाणी विरोध झाला. पण त्यांनी हार मानली नाही.

पोलीस आयुक्त व्यंकटेशम् यांनी २०१९ मध्ये पुण्यात ठिकठिकाणी ‘ऑपरेशन्स’ राबवले आणि 500 कोयते जप्त केले. ज्यांच्याकडून हे कोयते जप्त करण्यात आले, त्यांची गुन्हेगारी ओळख पटवून त्यांच्याविरुध्द कारवाई करण्यात आली.

‘कोयता पॅटर्न’ जवळपास संपुष्टात आल्याचं पोलीस अधिकार्‍यांना वाटू लागलं. पण गुन्हेगारीचं हे चक्र थांबत नसतं. दरम्यान, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या कार्यकाळात शंभर जणांविरुध्द तडीपारीची कारवाई करण्यात आली. त्यामुळे अनेक गुन्हेगार जेलमध्ये गेले. परिणामी पुणे दहशतमुक्त, पुणे गँग मुक्त अशा चर्चा व्हायला लागल्या.

गँगचे मोठे लिडर जेलमध्ये गेल्यानं उघड्यावर पडलेल्या छोट्या आणि अल्पवयीन गुंडांनी कोयता हातात घेऊन दहशत माजवायला सुरुवात केली. या मंडळींची ‘मोडस ऑपरेंटी’ अशी होती, की कोयत्यानं कोणाचा खून करायचा नाही. तर नुसती किरकोळ मारहाण करुन दहशत निर्माण करायची.

या ‘मोडस ऑपरेंटी’मुळे गंभीर गुन्ह्यांची कलमं न लावली जाता किरकोळ कलमान्वये गुन्हा दाखल होतो. परिणामी लवकर बाहेर सुटून येणं सोपं होतं. या पार्श्वभूमीवर हत्यार कोणतंही असो, गुन्हेगारांविरुध्द गंभीर आणि मोठ्या कलमान्वये गुन्हे दाखल व्हायला हवेत. ज्यायोगे पुणेकर असल्या गुन्हेगारी टोळ्यांच्या दहशतीखाली राहणार नाहीत.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :