कोतवाली पोलीस ठाणे : जातीवाचक शिवीगाळ, केडगावच्या ५ जणांवर ॲट्रोसिटी दाखल 

spot_img

कोतवाली पोलीस ठाणे : जातीवाचक शिवीगाळ, केडगावच्या ५ जणांवर ॲट्रोसिटी दाखल 

अहमदनगर – एकास जातीवाचक शिवीगाळ करुन मारहाण केल्याप्रकरणी केडगावच्या पाचजणांविरुद्ध ॲट्रोसिटी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीत विशाल मछिंद्र शिरवाळे (वय २३, रा काटवान खंडोबा महात्मा फुले वसाहात बिडींग नं १८, अहमदनगर) असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. मनोज भाऊसाहेब कराळे, ऋषीकेष परदेशी, ओमकार कराळे, भाऊसाहेब लक्ष्मण कराळे, मदणे पूर्ण नाव माहीत नाही (सर्व रा केडगाव अहमदनगर) या सर्वांवर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत समजलेली माहिती अशी की, बापू सातपुते यांच्या स्प्रेशर पंपासमोर लिंकरोड कोडगाव अहमदनगर येथे दि‌.१६ एप्रिल २०२३ ला ८.४५ वाजण्याच्या सुमारास मनोज भाऊसाहेब कराळे, ऋषीकेष परदेशी, ओमकार कराळे, भाऊसाहेब लक्ष्मण करळे, मदणे पूर्ण नाव माहीत नाही (सर्व रा केडगाव अहमदनगर) हे त्याच्या मित्रासोबत उभे असताना मनोज भाऊसाहेब कराळे व ऋषीकेष परदेशी समोरून येणाऱ्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीतील माझ्याकडे मनोज भाऊसाहेब कराळे, ऋषीकेष परदेशी यांनी पाहुन दंड थोपटून मला मोठ मोठ्याने आवाज देऊन जातीवाचक शिवीगाळ करीत तुझा बाप दिलाप सातपुते कुठे गेला, असे म्हणाले. मी त्यांना काय झाले असे म्हणलो असता, मनोज भाऊसाहेब कराळे, ऋषीकेष परदेशी, ओमकार कराळे, भाऊसाहेब लक्ष्मण करळे, मदणे पूर्ण नाव माहीत नाही (सर्व रा केडगाव अहमदनगर) ही सर्व आमच्याकडे आले.
त्यापैकी मनोज भाऊसाहेब कराळे, ऋषीकेष परदेशी व ओमकार कराळे यांनी हातात लाकडी दांडके घेऊन येऊन मला घेरुन म्हणाले की, जातीवाचक बोलून लोकांसोबत फिरल्याशिवाय आणि त्याचे तळवे चाटल्यालिवाय जमत नाही का? सातपुतेच्या कुत्र्या लय बरोबर का. आता पाहातो तुला सोडवायला कोण यतो, असे म्हणून त्यापैकी मनोज भाऊसाहेब कराळे, ऋषीकेष परदेशी यांनी त्याच्या हातातील लाकडा दांडक्याने कुल्यावर व पाठीवर मारले. खाली पाडले व लाथाबुक्याने मारहाण केली. खाली जमीनीवर पडले तेव्हा ऋषीकेष परदेशी याने माझ्या मानेवर पाय दिल्याने बेशुद्ध पडलो.
त्यानंतर कोणीतरी मला सिव्हील हॉस्पिटल येथे ॲडमिट केले आहे, या सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या विशाल मछिंद्र शिरवाळे (वय २३, रा काटवान खंडोबा महात्मा फुले वसाहात बिडींग नं १८, अहमदनगर) यांच्या‌ जबाबवरुन संबंधितांवर कलम ३७३ / २०२३ भादंवि ३२४, १४३, १४७, ५०४, ५०६ तसेच सह कलम अनुसूचित जाती आणि अनुसुचित जामाती (अत्याचाक प्रतीबंधक) अधिनियम १९८९ चे कलम ३(१) आर) याप्रमाणे कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे व नगर शहर डिवायएसपी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिस ठाण्याचे पोनि चंद्रशेखर यादव यांच्या सूचनेनुसार सपोनि रविंद्र पिंगळे, पोसई मनोज महाजन, श्री कचरे हे पुढील तपास करीत आहेत.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :