‘केरला स्टोरी’ची अभिनेत्री अदा शर्मा पुण्यात आली आणि काय म्हणाली पुणेकरांना ?
केरला स्टोरीमध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्याअदा शर्माची पुण्यात इंट्री झाली आणि त्याची सोशल मिडियावर चर्चा होताना दिसते आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे अदानं तिच्या खास शैलीत पुणेकरांना केरळ स्टोरीच्या निमित्तानं या चित्रपटाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल आभार मानले आहेत. त्यांना धन्यवादही दिले आहेत.
यापूर्वी पुण्यातील एफटीआयआय संस्थेमध्ये द केरला स्टोरीचे स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते. त्याला संस्थेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर विरोध केला होता. आपण काही केल्या त्या स्क्रीनिंगला उपस्थित राहणार नाही, असा आक्रमक पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला होता.
यात विद्यार्थ्यांनी हा चित्रपट पाहावा त्यानंतर आम्ही बोलू, अशी भूमिका आयोजकांनी घेतली होती. तुम्ही हा चित्रपट न पाहता त्यावर टीका कशी काय करता, असा प्रश्न निर्मात्यांचा होता.
अदा शर्माच्या एका पोस्टनं लक्ष वेधून घेतले आहे. त्यात तिनं पुण्यातील काही संस्थामधील फोटो शेयर केले आहेत. पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमा दरम्याचे फोटो शेयर करुन तिनं पुणेकरांचे आभार मानले आहेत. पुणेकर तुम्हा सर्वांना खूप प्रेम…अशा शब्दांत अदानं भावना व्यक्त केली आहे.