कितीही प्रयत्न केला तरी माणूस लांडग्यासारखा दिसेल का ?नाही ना ? पण ‘या’ तरुणानं यासाठी तब्बल 18 लाख रुपये खर्च केलेत !

spot_img

कितीही प्रयत्न केला तरी माणूस लांडग्यासारखा दिसेल का ?नाही ना ? पण ‘या’ तरुणानं यासाठी तब्बल 18 लाख रुपये खर्च केलेत !

 

वाचा ही अजब गजब आणि आगळी वेगळी बातमी !

 

हल्ली कोण कसला प्रयोग करील, हे सांगता येणार नाही. मनुष्य जन्म हा सर्वात जन्मात श्रेष्ठ आहे, असं आपलं सायन्स आणि अध्यात्म सांगतं. मेडिकल सायन्सनुसार मानवी शरिराची किंमत 5 कोटी रुपये आहे. मात्र श्रेष्ठ आणि दुर्मिळ असा मानवी जन्म मिळूनही आपण लांडग्यासारखं दिसावं, यासाठी एका तरुणानं तब्बल 18 लाख रुपये खर्च केले आहेत.

 

 

या तरुणानं लांडग्यासारखे दिसण्यासाठी झेपेट नावाच्या कंपनीमध्ये हा खर्च केलाय. यावर हा तरुण म्हणतो, की ‘मला लहानपणापासून प्राण्यांची आवड होती. टीव्हीवर दिसणार्‍या प्राण्यांसारखे दिसण्याचा मी प्रयत्न करायचो. म्हणूनच मी खूप पूर्वी विचार केला की मला एखाद्या प्राण्यासारखे दिसले पाहिजे’.

 

तो तरुण अनेक वेळा झेपेट कंपनीच्या स्टुडिओत त्याच्या फिटिंगसाठी आणि मोजमापासाठी गेला होता. कंपनीने सांगितले की, ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन आम्हाला प्रत्येक छोट्या डिटेल्स वाचाव्या लागल्या आणि वुल्फ ड्रेस तयार करण्यासाठी सुमारे ५० दिवस लागले.

 

लांडग्याचा पोशाख घातल्यानंतर, तो तरुण कंपनीच्या कामावर खूप खूष झाला. त्याला हवा होता तसाच ड्रेस तयार झाला होता. तो

तरुण म्हणाला, ‘शेवटचे फिटिंग अजून व्हायचे आहे. पण स्वतःला आरशात बघून आश्चर्य वाटते. हा एक असा क्षण आहे जेव्हा माझे स्वप्न पूर्ण झाले’.

 

 

तो पुढे म्हणाला, ‘मागच्या पायांवर चालणाऱ्या खऱ्या लांडग्यासारखे दिसणे’ हे माझे लक्ष खरं तर अवघड होते, परंतू संपूर्ण सूट माझ्या कल्पनेप्रमाणेच बनला आहे. दरम्यान, झेपेट कंपनीनं सांगितलं की, आम्ही प्राण्यांचा पोशाख डिझाइन करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी टोको नावाच्या व्यक्तीने स्वतःला कुत्र्याचे रुप दिले होते. एका सुंदर पोशाखासाठी त्यानं 12 लाख खर्च केले होते.

 

मानवी जन्मात प्राण्यांसारखं दिसणं, ही इच्छा म्हणजे मुर्खपणाचा कळस आहे. यासाठी लाखो रुपये खर्च करणं हा खरं तर लक्ष्मीचा अपमान आहे. मात्र अनेकांकडे कमी काळात अमाप पैसा आला, की तो कुठं खर्च करायचा, याची अशा लोकांना अक्कल नसते. त्यामुळेच ही मंडळी कशावरही पैसे उधळतात, हेच या बातमीतून आम्हाला दाखवून द्यायचं होतं.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :