कार घेताय? मग सीएनजी कारलाच प्राधान्य द्या ! कारणं काय, घ्या जाणून 

spot_img

कार घेताय? मग सीएनजी कारलाच प्राधान्य द्या ! कारणं काय, घ्या जाणून

 

 

पेट्रोल-डिझेलच्या किंमती Petrol-Diesel Rates वाढत्या किंमती पाहून कार घेण्याचा विचार करणाऱ्या अनेकांचं बजेट कोलमडलंय. तुम्हीही नवी कार News Car घेण्याचा विचार करत असाल, तर सीएनजी CNG कार तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय असू शकते.

 

 

सीएनजी कारला CNG Car चांगलं मायलेज मिळतं आणि ते पेट्रोल-डिझेलपेक्षाही स्वस्त आहे.

मारुती सुझुकी अल्टो (Maruti Suzuki Alto) ही सर्वांत स्वस्त हॅचबॅक कारपैकी एक आहे. या कारमध्ये 800 सीसी इंजिन आहे.

 

 

हे इंजिन 40 hp पॉवर आणि 60 Nm टॉर्क जनरेट करते. हे 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन गिअर बॉक्ससह येतं. कारची सुरुवातीची किंमत 4.66 लाख रुपये आहे. ही कार सीएनजीवर चालल्यास 31.59 किमी प्रति किलो मायलेज देते.

 

दुसरी कार आहे, मारुती सुझुकी सेलेरियो Maruti Suzuki Celerio ही कार सर्वात लोकप्रिय सीएनजी कारपैकी एक आहे. ही कार फास्ट हँडलिंग, फीचर्स, लुक आणि कमी किंमतीसाठी ओळखली जाते.

 

 

मारुती सुझुकी सेलेरियो

Maruti Suzuki Celerio CNG हॅचबॅकमध्ये 1.0-लिटर इंजिन आहे, जे 57 PS पॉवर आणि 78 Nm टॉर्क जनरेट करते. Maruti Suzuki Celerio CNG व्हेरियंट 30.47 किलोमीटर प्रति किलो मायलेज देते.

 

 

ही कार CNG प्रकार VXi आणि VXi(O) ट्रिम व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे आणि तिची किंमत 5.85 लाख आणि 5.90 लाख रुपयांच्या दरम्यान आहे.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :