कांदा उत्पादक शेतकरी झाला आक्रमक ; भाऊ वाढीसाठी भजन करीत केला रास्ता रोको 

spot_img

कांदा उत्पादक शेतकरी झाला आक्रमक ; भाऊ वाढीसाठी भजन करीत केला रास्ता रोको 

बीडच्या आष्टी तालुक्यातील धामणगावमध्ये कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. (Beed) बीड -अहमदनगर महामार्ग आडवत शेतकऱ्यांनी ( farmer) भजन करत रास्ता रोको केला.

कांदा उत्‍पादक शेतकरीला भाव मिळालेला नाही. यातच कांदा पीक अनुदान मिळण्यासाठी सात- बारा पिक पेऱ्याची जाचक अट लावली आहे. ही अट रद्द करण्यात यावी. यासाठी हा रस्ता रोको करण्यात आला. यात महिला शेतकऱ्यांचा देखील मोठा सहभाग होता. शेतकऱ्यांनी रस्‍त्‍यावर बसत भजन गात रास्‍ता रोको केला. यामुळे दोन्‍ही बाजूंची वाहतूक थप्‍प झाली होती.

दरम्यान आपल्याकडील मोबाईल दाखवत या मोबाईलवरून आम्ही नोंद कशी करायची. आता तुम्हीच सांगा जवळपास १०० टक्के शेतकरी हे अडाणी आहेत. मात्र पावतीवर तुम्हाला कळत नाही का? हा शेतकऱ्यांनी पिकवलेला कांदा आहे म्हणून? असा सणसणीत सवाल करत तात्काळ पिक पेऱ्याची अट रद्द करा. अशी मागणी आंदोलनात सहभागी झालेल्या वृद्ध महिला शेतकऱ्यांनी केली आहे.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :