कसबा पेठ अन् पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीसाठी 27 फेब्रुवारीला मतदान.! राष्ट्रवादी अन् भाजप

spot_img

कसबा पेठ अन् पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीसाठी 27 फेब्रुवारीला मतदान.! राष्ट्रवादी अन् भाजप

 

पुणे : भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर दोन्ही मतदार संघात विधानसभेची पोटनिवडणुक होणार आहे. पिंपरी चिंचवड आणि पुण्यातील कसबापेठ मतदार संघात विधानसभेची जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे या दोन्ही जागेच्या पोटनिवडणुकरीता येत्या 27 फेब्रुवारी रोजी मतदान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अलिकडेच पिंपरी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप आणि कसबापेठ विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचं गंभीर आजारानं निधन झालं. त्यामुळे दोन्ही ठिकाणी सहा महिन्याच्या आत पोटनिवडणुक घेणे आवश्यक आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी भाजप पुन्हा आपली सत्ता राखण्यात यशस्वी होणार का ? त्याकडे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

 

लक्ष्मण जगताप यांच्या निधनांनंतर त्याजागी पोटनिवडणुक होणार त्यांच्या जागी त्यांच्या पत्नी अश्विनी की बंधू शंकर जगताप या दोघांपैकी कोण निवडणुक लढेल, बिनविरोध होईल की राष्ट्रवादी निवडणुक लढवेल याची चर्चा असताना परिस्थिती पाहून आम्ही निर्णय घेऊ असं राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्पष्ट केले. तर कसबा पेठ विधानसभेची जागा राष्ट्रवादी लढवणार नसल्याचे त्यांनी आधीच सांगितले आहे.

 

 

दरम्यान, अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेनेने  ऋुतजा लटके यांना  उमेदवारी दिल्याने त्याठिकाणी भाजपने आपला उमेदवार माघारी घेतला. त्यामुळे त्याठिकाणी पोटनिवडणुक बिनविरोध झाली. त्यामुळे पुण्यातील य़ा दोन विधानसभेच्या मतदार संघातही पोटनिवडणुक बिनविरोध होईल की जोरदार लढत होईल. याकडे सगळ्याचं लक्ष्य लागून  आहे.

 

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :