तक्रारदारानं दिलेली फिर्याद दखलपात्र असूनही गुन्हा दाखल न करता कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कमलेश कुसाळकर (वय – 40 वर्षे,सध्या नेमणूक – स. पो. नि., आर. ए. के. मार्ग पोलीस स्टेशन, मुंबई)या पोलीस अधिकार्याविरुध्द माटुंगा पोलीस ठाण्यात (मुंबई) Matunga Police Station Mumbai न्यायालयाच्या आदेशानुसार भादंवि 578 / 22 कलम 166 (अ) या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी अरुण नारायण मोगविरा (वय 45 वर्षे, व्यवसाय – सेल्समन, रा. रूम नंबर 08, भिवंडीवाला बिल्डिंग, एल. एन. रोड, माटुंगा पुर्व, मुंबई) यांनी फिर्याद दिली. तत्कालीन माटुंगा पोलीस ठाणे, मुंबई येथे ड्युटी अधिकारी म्हणून नेमणुकीस असलेले (सध्या नेमणूक आर.ए. किडवाई मार्ग पोलीस ठाणे, मुंबई) यांनी अरुण मोगविरा यांची तकार दखलपात्र असूनही गुन्हा नोंद करण्याचे कायदेशीर कर्तव्य टाळले.
महानगर दंडाधिकारी (30 वे न्यायालय, कुर्ला, मुंबई) या न्यायालयाने त्यांचे विरोधात भा. द. वि. दंड संहतेच्या कलम 166 – अ अन्वये गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले.
त्यावरुन आणि नमूद आदेशासह माटुंगा पोलीस स्टेशन येथे मोरगिरा हे फिर्याद देण्यास आल्याने त्यांचे फिर्यादीवरून आरोपीचे विरोधात गु.र.क्र. ५७८/२२ कलम १६६ अ भा.दं.वि. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.