कर्जाला विमा संरक्षण आणि जामीनदाराला ‘टेन्शन फ्री’ करण्याचा परिवर्तन पॅनलचा निर्धार! पोलीस सोसायटीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू!

spot_img

कर्जाला विमा संरक्षण आणि जामीनदाराला ‘टेन्शन फ्री’ करण्याचा परिवर्तन पॅनलचा निर्धार!
पोलीस सोसायटीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू!

अहमदनगर जिल्ह्यातल्या हजारो पोलीस कर्मचाऱ्यांची कामधेनू असलेल्या पोलीस को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी जिल्ह्यात सध्या जोरदार सुरू आहे. या निवडणुकीत परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांनी सोसायटीच्या सभासदांना एक मोठा सुखद असा धक्का देण्याचा किंबहुना एक प्रकारचा दिलासा देण्याचा निर्धार केला आहे.

जे सभासद या सोसायटीकडून कर्ज घेतात, त्या सभासदांच्या कर्जाला पूर्णतः विमा संरक्षण देण्याचा आणि या कर्जासाठी जे जामीनदार राहतात, त्या जामीनदाराला पूर्णपणे ‘टेन्शन फ्री’ करण्याचा निर्धार या पॅनलने केला आहे. या पॅनलचे प्रमुख असलेले पोलीस कॉन्स्टेबल रेवणाथ दहिफळे यांच्याशी यांच्याशी ‘महासत्ता भारत’च्या श्रीरामपूर प्रतिनिधीने संपर्क साधला असता दहिफळे यांनी ही माहिती दिली.

ते म्हणाले जिल्ह्यात साडेतीन हजार पोलीस कर्मचारी आहेत. त्या पोलीस कर्मचारी बांधवांच्या प्रश्नांसाठी या पॅनलचे सर्वच उमेदवार सदैव कटिबद्ध राहतील. या सोसायटीचा कारभार पूर्णतः संगणकीकृत करण्याचा निर्धार आम्ही केला आहे. प्रत्येक सभासदाला ऑनलाईन युजर आयडी आणि पासवर्ड दिला जाणार आहे, ज्यामुळे त्यांच्या खात्याचा कारभार त्यांना स्वतःच्या मोबाईलवर पाहता येणार आहे. कर्ज मंजुरीची जी कालमर्यादा आहे, ती आम्ही कमी केली आहे. कमीत कमी कालावधीमध्ये कर्ज मंजूर करण्याचा आमचा निर्धार आहे.

सोसायटीचा कारभार संगणकीकृत करत असताना प्रत्येक सभासदाला एसएमएसद्वारे त्याच्या खात्याचं अपडेट्स देण्यात येणार आहे. तातडीची कर्ज मर्यादा आम्ही एक लाख रुपये पर्यंत करणार आहोत‌. दहा लाखांऐवजी 15 लाखापर्यंत कर्जाची मर्यादा ठेवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. या सोसायटीच्या सभासदांचा हक्काचा डिव्हिडंट चांगल्या टक्केवारीने परत देण्याचा आमचा निर्धार आहे. महिला पोलीस कर्मचारी आणि सर्वच पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्याचा आमचा मानस आहे.

पोलिसांच्या पाल्यांसाठी स्पर्धा परीक्षा पोलीस भरती यासाठी तज्ञांमार्फत विशेष मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याचा आम्ही विचार करणार आहोत. सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन आम्ही घेणार आहोत. या सोसायटीच्या सभासदांकडून आलेल्या सूचना आणि विविध उपक्रमांसंदर्भात सोसायटीच्या सभेत आम्ही विचार विनिमय करून त्यावर निर्णय घेणार आहोत.

दरम्यान, या सोसायटीच्या निवडणुकीच्या निमित्ताने पोलीस कर्मचारी बांधवांच्या गाठीभेटी घेत असताना परिवर्तन पॅनलला सभासदांचा उदंड असा प्रतिसाद मिळत आहे, असेही रेवणनाथ दहिफळे म्हणाले.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :