औरंगाबादच्या ‘या’ आमदारानं पुणे झेडपीत मागितली ‘ही’ मागणी!

spot_img

औरंगाबादच्या ‘या’ आमदारानं पुणे झेडपीत मागितली ‘ही’ मागणी !

पुणे जिल्ह्यातल्या शिक्षकांच्या सुरु असलेल्या बदली प्रक्रियेत किती शिक्षकांनी शस्त्रक्रिया केल्याचं प्रमाणपत्र सादर केलं, किती जणांनी शस्त्रक्रिया करण्यासाठी अर्जित रजा घेतलेल्या नाहीत आणि किती जणांनी अंतर आणि दिव्यांगांबाबतचे बोगस प्रमाणपत्र सादर केलेलं आहे, या मुद्यांबाबत गाव आणि शाळानिहाय माहिती देण्याची मागणी औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांनी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे केलीय.

त्याचप्रमाणं आमदार बंब यांनी अशीदेखील माहिती मागवलीय, की किती शिक्षकांनी जिल्हांतर्गत बदल्यांमध्ये सूट मिळावी किंवा आपल्या सोईनुसार हव्या त्या शाळेवर नियुक्ती मिळावी, यासाठी बोगस शस्त्रक्रिया आणि अंतराबाबतचा बोगस दाखला आणि दिव्यांग प्रमाणपत्रं सादर केली, याची गाव आणि शाळानिहाय माहिती देण्याची मागणी केली आहे.

आमदार बंब यांनी १० डिसेंबर २०२२ ला सीईओ आयुष प्रसाद यांना हे पत्र दिलं आहे.
पुणे जिल्ह्यातल्या काही शिक्षकांनी चार संवर्गापैकी पहिल्या दोन संवर्गात बदलीतून सूट मिळण्यासाठी कोणी बोगस घटस्फोट, कोणी बोगस शस्त्रक्रिया तर कोणी अंतराचा बोगस दाखला सादर केल्याच्या बातम्या प्रसिध्द झाल्या होत्या.

विशेष म्हणजे याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाकडे खुद्द शिक्षकांनीच तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत बंब यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना हे पत्र पाठविलं आहे.
जिल्ह्यातील प्राथमिक

दरम्यान, शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरु झाली आहे. या बदल्यांमध्ये संवर्ग एकमध्ये दिव्यांग, पक्षघाताने आजारी, हृद्य शस्त्रक्रिया झालेले, यकृत प्रत्यारोपण, कर्करोगाने ग्रस्त, मेंदूचा आजार किंवा शस्त्रक्रिया झालेले आजी-माजी सैनिकांचे पाल्य, विधवा, अविवाहित शिक्षिका, घटस्फोटित, परित्यक्ता आदी श्रेणीतील शिक्षकांचा तर, संवर्ग दोनमध्ये पती-पत्नी एकत्रत्रिकरणाच्या मुद्यांचा समावेश आहे.

यापैकी कोणताही एका प्रकारात येत असलेल्या शिक्षकांना एक तर त्यांच्या इच्छेनुसार सोईची शाळा मिळते किंवा बदलीतून सूटही मिळविता येते. याचा फायदा घेण्यासाठी काही शिक्षकांनी जाणीवपूर्वक ही बोगस प्रमाणपत्रे सादर केल्याचा आरोप शिक्षकांनीच केलेला आहे.

अशा परिस्थितीत आमदार प्रशांत बंब यांनी जे पत्र पुणे जिल्हा परिषदेच्या सीईओ आयुष प्रसाद यांना दिलंय, त्या पत्रानं जिल्हा परिषद शिक्षकांमध्ये उलट सुलट चर्चांना मोठं उधाण आलंय.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :