ऑनलाइन बिंगोचा लागला ‘त्याला’ नाद आणि तो करू लागला घरफोड्या ; पोलिसांनी आवळल्याच त्याच्या मुसक्या !

spot_img

हल्ली ऑनलाइन बिंगो जुगाराचं प्रचंड असं पेव फुटलं आहे. आजकाल प्रत्येकाच्या हातात अँड्रॉइड मोबाईल असल्यामुळे त्या मोबाईलवर ऑनलाईन बिंगो जुगार सर्रास खेळले जात आहेत. दुर्दैवाने शालेय विद्यार्थीदेखील बळी पडत आहेत. अशाच एका युवकाला ऑनलाईन बिंगो जुगाराचा नाद लागला आणि पैसे कमी पडू लागल्यानंतर त्याने घरफोड्या करण्याचा मार्ग पत्करला. पण चाणाक्ष पुणे पोलिसांनी अखेर त्याच्या मुसक्या आवळल्याच.

मुकेश बबन मुने (रा. सुतारदरा कोथरूड पुणे) असं त्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून २० लाख ९२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी नितीन सुरेश बागडे अहमदनगरच्या मालेगाव परिसरात राहणाऱ्या तरुणाला देखील अटक केली आहे. पुण्याच्या वानवडी परिसरातल्या एका सोसायटीत घरफोडी झाली होती. त्या घरफोडीत ४० लाखांचा ऐवज चोरीला गेला होता.

या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेच्या युनिट ५ ने केला. या पोलिसांनी रेकॉर्डवर असलेल्या शंभर गुन्हेगारांची तपासणी केली. मात्र त्यावेळी मुकेश मुने हा पोलिसांना मिळून आला नाही. पोलिसांनी सखोल माहिती घेतली असता तो भिवंडी येथे राहायला गेल्याचे समजले.

दरम्यान, मुकेश मुने आणि त्याचा मित्र सुरेश बागडे हे दोघे पुण्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी शोध घेत असता ते दोघे चंदननगर, खराडी परिसरात मिळून आले. घरफोडीत चोरलेले सोने नितीन बागडे हा अहमदनगरच्या ओळखीच्या सराफांना विकत असल्याची माहिती त्यांन दिली आहे. त्यामुळे हे सराफ पुणे पोलिसांच्या रडारवर आहेत.

पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह आयुक्त संदीप कर्णिक, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, सहाय्यक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश लाहोटे, पोलीस आमदार रमेश साबळे, प्रताप गायकवाड, विनोद शिवले, शशिकांत नाळे, अकबर शेख, दयाराम शेगर, राहुल ढमढेरे, प्रमोद टिळेकर आणि संजय कुमार दळवी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :