एसीचा खर्च सामान्यांना परवडणारा नाही. त्यामुळे बहुतेक लोकं कुलर किंवा पंख्याचा वापर करताहेत. एसीसारखी थंड हवा पंख्यामधून येत असेल तर मग एसीची काय गरज, असं तुम्हाला वाटत असेल. मात्र असा एक पंखा आहे, जो १२ डिग्री अंश सेल्सिअसपर्यंत खोली थंड करतो. स्वस्त आणि मस्त असा हा पंखा आहे. बाजारात असे काही पंखे आहेत, जे खोली थंड ठेवण्यासाठी मदत करताहेत.
हे प्रॉडक्ट आहे ओरिएंट इलेक्ट्रिक क्लाऊड तीन कुलिंग फॅन. यात काही खास फिचर्स आहेत. या पंख्याची किंमत ११ हजार ९९९ रुपये आहे. ॲमेझॉनवर हा उपलब्ध आहे. या पंख्यात तुम्ही फ्रॅगनन्स टाकू शकता.
हा पंखा रिमोट कंट्रोलवर चालतो. यात तीन स्पिडिंग कुलिंगचे ऑप्शन आहेत. या पंख्यात तुम्हाला अरोमाचे ऑप्शन मिळते. याशिवाय बिल्ट इन टायमरही दिला आहे. एसीच्या तुलनेत विजेचे बील या पंख्याचा वापर केल्याने कमी येते.
या पंख्यात क्लाऊड चील टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला. त्यामुळे खोली थंड ठेवण्याचे काम हा पंखा करतो. कुलरसारखं आपण या पंख्यात पाणी भरू शकतो. हा पंखा खोलीचे तापमान कमी-जास्त करू शकतो.