एसबीआयनं आणलाय गुंतवणुकीची ‘ही’ भन्नाट योजना!

spot_img

शेअर बाजारात गुंतवणूक करताना धोका पचवण्याची ताकद ठेवावीच लागते. शेअर बाजारात सध्या असं वातावरण आहे, की गुंतवणूक करणार्‍यांमध्ये चलबिचल सुरु आहे. शेअर बाजारातल्या गुंतवणुकीच्या भरवशावर अनेक जण भविष्य आणखी सुरक्षित करण्याचा प्रयत्न करतात. मात्र कधी कधी चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक झाल्यास त्यांच्या अडचणींमध्ये वाढ होते.

अशा परिस्थितीत योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्या समस्या निर्माण होणार नाहीत. देशातरल्या सर्वात मोठ्या आणि नामांकित अशा स्टेट बँक आॅफ इंडिया State Bank Of India बँक ग्राहकांसाठी एक चांगली अभिनव योजना आणलीय. अॅन्युटी स्कीम Annuity Scheme या नावानं एसबीआयनं आणलेल्या या योजनेअंतर्गत स्टेट बँकेच्या सर्वच शाखांमधून गुंतवणूक करता येणार आहे.

या योजनेत कमीत कमी २५ हजार रुपये गुतवावे लागणार आहेत. एसबी आयचे कर्मचारी आणि यापूर्वीच्या कर्मचार्‍यांना एक टक्का जास्त व्याज मिळणार आहे. या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना ० . ५ टक्के जादा व्याज मिळणार आहे. टर्म डिपाॅझिटच्या व्याजाचे दर या योजनेवरही लागू होणार आहेत.

अॅन्युटी स्कीमचा परतावा डिपाॅझिट झाल्यावर पुढच्या महिन्यापासून ठराविक तारखेला होणार आहे. टीडीएस TDS कट करुन बचत खाते Saving Account किवा चालू खात्यात Curant Acount परतावा जमा केला जाणार आहे. एकमुखी रकमेवर चांगला परतावा मिळविण्यासाठी या योजनेत चांगले प्लॅन्स आहेत.

विशेष परिस्थितीमध्ये अॅन्युटीच्या बॅलेन्समध्ये रकमेच्या ७५ टक्क्यांपर्यंतच्या राशींचा ओव्हरड्राॅप Over Drop किंवा कर्ज Loan गुंतवणूकदाराला मिळू शकतं. बचत खात्यापासून Annuity Scheme मध्ये चांगला परतावा मिळतो आहे.

एसबीआयच्या SBI या योजनेत की 36, 60, 84 किंवा 120 महिन्यांच्या कालावधीसाठी गुंतवणूक केली जाऊ शकते. यामध्ये गुंतवणुकीचा व्याज दर हा तुम्ही निवडलेल्या कालावधीच्या टर्म डिपाॅझिटसाठी असते. अधिक माहितीसाठी तुमच्या नजिकच्या एसबीआय बँकेच्या शाखेत संपर्क साधावा.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :