एक लाखाची लाच घेताना दोन क्लासवन अधिकारी ACB च्या जाळ्यात..!

spot_img

यशस्वी सापळा कारवाई

▶️ युनिट – अँटी करप्शन ब्युरो , पालघर

▶️ तक्रारदार- पुरुष वय 37 वर्षें ,
▶️ आरोपी- 1. श्री.प्रताप हरचंद मचिए वय- 50 वर्षे कार्यकारी अभियंता, म.रा.वि.मं., पालघर (वर्ग 1), ता.जि. पालघर.
2. श्रीमती किरण हरिष नागावकर, वय 45 वर्षे, अधीक्षक अभियंता, म.रा.वि.म., (वर्ग 1), ता.जि.पालघर

 

▶️ लाचेची मागणी- 2,00,00/- रु.
▶️ तडजोडीअंती मागणी:- 1,50,000/- रु.

▶️ लाच स्विकारली 1,00,000/- रु
▶️ हस्तगत रक्कम- 1,00,000/-रु
▶️ लाचेची मागणी – दि. 21/12/2022
▶️ लाच स्विकारली –
दि. 26/12/2022 रोजी. 17.09 वा.

 

▶️ लाचेचे कारण -. यातील तक्रारदार यांचेविरुद्ध आलोसे क्र. 2 यांचेकडे दोन-तीन तक्रारी प्राप्त असुन त्यामध्ये तक्रारदार यांचेवर कोणतीही कारवाई होऊ द्यायची नसेल तर आलोसे क्र. 2 यांना रु. 2,00,000/- द्यावे लागतील असे आलोसे क्र. 1 यांनी तक्रारदार यांना आलोसे क्र. 2 यांचा निरोप असल्याचे सांगुन आलोसे क्र. 2 च्या वतीने तक्रारदार यांचेकडे लाचेची मागणी केली.

त्यावरुन केलेल्या लाचेच्या मागणीच्या पडताळणी दरम्यान आलोसे क्र. 1 यांनी तडजोडीअंती दीड लाख रुपयाची मागणी केली त्यास आलोसे क्र. 2 यांनी सहमती दर्शविल्याचे निष्पन्न झाले. त्यावरुन लाचेचा सापळा आजमाविला असता सदर लाचेच्या रकमेचा पहीला हप्ता म्हणुन रु.1,00,000/- आलोसे क्र 1 यांनी त्यांचे कार्यालयात स्विकारली असता आलोसे क्र 1 यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

आलोसे क्र 2 यांना ताब्यात घेऊन त्यांचेविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
पुढील कारवाई चालू आहे….

▶️ सापळा पथक –
नवनाथ जगताप,पोलिस उपअधीक्षक,
स्वपन बिश्वास, पोलीस निरीक्षक, पोहवा/ अमित चव्हाण,विलास भोये, नितीन पागधरे, निशा मांजरेकर,दिपक सुमडा पोना/सखाराम दोडे, स्वाती तारवी

▶️ मार्गदर्शन अधिकारी

मा.श्री. सुनिल लोखंडे,
पोलिस अधीक्षक, एसीबी, ठाणे परिक्षेत्र

मा.श्री.अनिल घेरडीकर, अप्पर पोलीस अधीक्षक, एसीबी, ठाणे परिक्षेत्र

▶️ आलोसे यांचे सक्षम प्राधिकारी – मा. मुख्य व्यवस्थापक, (तांत्रिक), प्रकाशगड, बांद्रा, मुंबई.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :