एका शेअरवर एक मोफत बोनस शेअर ! ‘या’ कंपनीनं दिली अफलातून आॅफर!

spot_img

एका शेअरवर एक मोफत बोनस शेअर ! ‘या’ कंपनीनं दिली अफलातून आॅफर !

तुम्ही आतापर्यंत एका शर्टवर एक शर्ट फ्री, एका साडीवर एक साडी फ्री अशी जाहिरात वाचली किंवा ऐकली असेलच. शेअर बाजारातही सध्या असंच काहीसं सुरु आहे. इलेक्ट्रिक व्यवसायाशी संबंधित असलेल्या इव्हान्स या कंपनीनंदेखील गुंतवणूकदारांना एक मजेशीर आॅफर Offer दिलीय.

या कंपनीच्या संचालकांची काल ( दि. 16) मिटींग Board Of Directer’s Meeting झाली. त्या मिटिंगमध्ये हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार इव्हान्स ही मल्टीबॅगर कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना त्यांनी होल्ड केलेल्या शैअरवर १ : १ या प्रमाणात मोफत बोनस शेअर देणार आहे.

दरम्यान, कंपनीनं बोनस शेअरची घोषणा करताच शेअर्सनी ट्रेडिंग सेशनमध्ये 52 आठवड्याची उच्चांकी किंमत स्पर्श केली. इव्हान्स कंपनीमध्ये ट्रेडिंग व्हाल्यूम कमालीचा वाढला होता. इव्हान्स इलेक्ट्रिक कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांची अप्पर सर्किटवर 411 . 65 किंमतीवर ट्रेड करत होते.

इव्हान्स इलेक्ट्रिक शेअर कंपनीची 52 आठवड्यांची उच्चांकी किंमत पातळी 411 . 65 रुपये आहे. तरीही ट्रेडिंग सेशनच्या शेवटच्या काही तासांत BSE शेअरची किंमत
4 . 09 टक्क्याच्या वाढीसह 408 . 10 रुपयांवर पोहोचली.

इव्हान्स इलेक्ट्रिक कंपनीचाया शेअरची 52 आठवड्याची निचांकी पातळी किंमत 70 रुपये होती. गेल्या महिन्यात ज्या लोकांनी इव्हान्स इलेक्ट्रिक कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतविले होते, त्यांना 5 रुपयांहून अधिक परतावा मिळाला होता.

विशेष म्हणजे अवघ्या 5 महिन्यांच्या कालावधीमध्ये या कंपनीच्या शेअरने लोकांना 450 टक्के परतावा मिळवून दिला आहे. BSE वर 14 जूलै रोजी या कंपनीचे शेअर 72 . 95 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. इव्हान्स कंपनीचे शेअर 16 डिसेंबर 2022 रोजी BSE निर्देशांकावर 408 . 10 या किंमतीवर ट्रेड करत होते.

जर तुम्ही इव्हान्स कंपनीच्या शेअर्समध्ये 14 जूलै 2022 रोजी 1 लाख रुपये लावले असते तर सध्या तुम्हाला 5 . 59 लाख रुपये नफा झाला असता. इव्हान्स इलेक्ट्रिक कंपनीच्या भाग भांडवलामध्ये प्रवर्तकांची भागीदारी 59 . 44 टक्के आहे.

कंपनीचं बाजार भांडवल 56 कोटी रुपये आहे. सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत कंपनीने 14 . 18 कोटी रुपये महसूल संकलित केला. सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत कंपनीने 2 . 76 कोटी रुपयांचा नफा मिळवला.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :