“एका बाजूला सन्मानाचे पोस्टर, तर दुसऱ्या बाजूला झुकते माफ..! मोदींच्या मुंबईतील पोस्टरची सर्वत्र चर्चा

spot_img

“एका बाजूला सन्मानाचे पोस्टर, तर दुसऱ्या बाजूला झुकते माफ..! मोदींच्या मुंबईतील पोस्टरची सर्वत्र चर्चा

 

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर असून भाजपकडून मिशन मुंबई महापालिकेचा जिंकण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. यावेळी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनेक विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण होणार आहे. त्याची जय्यत तयारी सध्या सुरू आहे. तसेच आज सायंकाळी बीकेसी मैदानावर त्यांची जाहीर सभा होणार असून भाजपकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता आहे.

 

मुंबईतून ज्या रस्त्यावरून मोदी प्रवास करणार आहेत. त्या रस्त्यावर नरेंद्र मोदी यांचे मोठमोठे पोस्टर लावण्यात आले आहेत. याचसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही पोस्टर लावण्यात आले आहे. तर दुसरीकडे बाळासाहेबांसमोर झुकते माफ देऊन मोदी आणि बाळासाहेबांचे पोस्टर लावून शिवसेनेने भाजपला डिवचलं आहे. या पोस्टवर कोणचंही नाव व चिन्ह नसून शहराच्या विविध भागात लावण्यात आले आहेत.

 

नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सांयकाळी मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7 चे लोकार्पण करण्यात येणार आहे. यानिमित्ताने वांद्रे-कुर्ला संकुल, एमएमआरडीए मैदान, मेट्रो मार्गिका 7, गुंदवली स्थानक ते मोगरापाडा मेट्रो स्थानक या ठिकाणी पंतप्रधानाचा दौरा आयोजिक केला आहे. त्यामुळे या भागात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच, दहशतवादी हल्ल्याबाबत सतर्कता जारी करण्यात आली आहे. ड्रोन आणि छोट्या विमानाने दहशतवादी हल्ला करू शकतात. त्यामुळे मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आदेशानुसार, पोलिसांच्या परवानगीशिवाय आकाशात ड्रोन, पॅरा ग्लायडर किंवा छोटी विमाने उडवण्यास बंदी करण्यात आली आहे.

 

दरम्यान मोदींच्या मुंबई दौऱ्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केलं आहे. मुंबई नगरीत आपले मन:पुर्वक स्वागत आहे. नरेंद्र मोदी उद्या आपल्या शुभ हस्ते मुंबईतील विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपुजन होणार असून या माध्यमातून मुंबईचा नक्कीच कायापालट होणार आहे , हा विश्वास आहे. असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

 

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :