एका पेन्सीलना मिनीटात घेतला पहिलीच्या अर्तिकाचा जीव; चिमुरडीने तडफडुन सोडला जीव
लखनऊ : एखाद्या अपघातात लहान मुलांचा बळी गेल्याचं किंवा ते गंभीर जखमी झाल्याचं आपण अनेकदा ऐकतो,पाहतो.खरं तर काही वेळा अजाणतेपणातुन अशा घटना घडत असतात.उत्तर प्रदेशात अशाच एका दुर्घटनेत एका लहान मुलीचा मृत्यू झाला आहे.लाकडाच्या पेन्सिलचं साल श्वासनलिकेत अडकुन बसल्याने ही घटना घडली.लहान चिमुरडीच्या मृत्युमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
उत्तर प्रदेशातील हमीरपुर जिल्ह्यात एक दुःखद घटना घडली आहे.बुधवारी संध्याकाळी घडलेल्या या घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.हमीरपुर येथे लाकडाच्या पेन्सिलचं साल घशात अडकून एका लहान मुलीचा तडफडून जीव सोडला आहे.खरं तर लहान मुलांकडे आई-वडिलांनी बारकाईने लक्ष देणं गरजेचं असतं.
पेन किंवा पेन्सिलचा वापर ते सावधगिरीनं करतात की नाही,हे पाहणं आवश्यक असतं.कारण यामुळे मुलांच्या डोळ्याला जखम होऊ शकते.बेडवर पेन्सिल किंवा पेन उघडं पडलं असेल तर त्याचं टोक टोचुनदेखील जखम होऊ शकते.लहान मुलांना कोणतीही गोष्ट उचलुन तोंडात घालण्याची सवय असते.त्यामुळे घरच्यांनी त्यांच्याकडे बारीक लक्ष ठेवलं पाहिजे,असं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
दरम्यान कोतवाली परिसरातील पहाडी वीर गावातील रहिवासी मिकासा यांनी या घटनेविषयी सविस्तर माहिती दिली.ते म्हणाले,“बुधवारी सायंकाळी माझा मुलगा अमोल(वय 12),मुलगी यशोदा(वय 8) आणि अर्तिका(वय 6) हे घराच्या टेरेसवर अभ्यास करत होते.अभ्यास करतेवेळी आर्तिका कटर तोंडात धरून पेन्सिलला टोक करत होती.
त्यावेळी पेन्सिलीचं साल कटरमधुन श्वासनलिकेत जाऊन अडकलं.“तीव्र वेदनांमुळे आक्रोश करत अर्तिका जमिनीवर लोळु लागली.त्यानंतर कुटुंबीय तिला जवळच्या रुग्णालयात घेऊन गेले.पण तिथं पोहोचल्यावर डाॅक्टरांनी अर्तिकाला मृत घोषित केलं.अर्तिका गावातील प्राथमिक शाळेत इयत्ता दुसरीत होती.