उर्फी थांबायचं नावच घेईना ; पोलिसांत हजर ; जबाब दिला आणि … !

spot_img

उर्फी थांबायचं नावच घेईना ; पोलिसांत हजर ; जबाब दिला आणि … !

 

महाराष्ट्रात एक प्रकरण सध्या खूपच गाजतंय. या प्रकरणामुळे या राज्यातल्या जनतेचे सारेच प्रश्न सुटलेत, सर्व समस्या मार्गी लावण्यात आल्या, फक्त एकच समस्या या राज्यात नव्यानंच उद्भवली आणि ती समस्या म्हणजे उर्फी जावेदचे कपडे, तिनं केलेलं ट्विट आदी.

 

 

भाजपच्या चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्या गेल्या अनेक दिवसांपासून शाब्दिक हल्ले आणि प्रति हल्ले सुरु आहेत. मात्र यामध्ये उर्फी काही केल्या थांबायला तयार नाही. तिला पोलिसांनी हजर होऊन जबाब द्यायला सांगितलं. त्यानुसार तिनं जबाबही दिला.

 

‘माझ्या घरच्यांना माझ्या कपड्यांबद्दल काहीच आक्षेपार्ह वाटत नाही, मी माझ्या कामानुसार कपडे घालते, पापासाझींद्वारे सोशल मिडियावर फोटो व्हायरल होताहेत, त्याला मी काय करु? असा जबाब पोलिसांत दिल्यानंतर उर्फीचा ‘टिवटिवाट’ सुरु आहे. त्यामुळे

अभिनेत्री उर्फी जावेद आणखी वादात अडकण्याची चिन्हे दिसत आहेत.

 

 

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदच्या अनोख्या फॅशनवर आक्षेप घेत कारवाईची मागणी केली होती. चित्रा वाघ यांनी उर्फीवर सार्वजनिक ठिकाणी अश्लिलता पसरवल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी त्यांनी तक्रार देखील घेतली होती.

 

 

उर्फी जावेदची आज (दि. १४) अंबोली पोलीस ठाण्यात चौकशी करण्यात आली. यावेळी उर्फीने तिला संविधावने कपडे परिधान करण्याचे स्वतंत्र्य दिले असल्याचे सांगितले. दरम्यान उर्फी जावेदने ट्वीटरवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

 

‘एकीकडे त्यांना हिंदू राष्ट्र हवे आहे, तर दुसरीकडे महिलांच्या कपड्यांवर नियंत्रण ठेवण्याचे तालिबानी नियम लागू करायचे आहेत. हिंदू धर्म हा सर्वात जुना धर्म आहे, तो स्त्रियांच्या बाबतीत खूप उदारमतवादी म्हणून ओळखला जातो. मग तुम्ही कुठल्या संस्कृतीबद्दल बोलताय, असा सवाल उर्फी जावेदनं उपस्थित केलाय.

 

दरम्यान, उर्फी जावेदने नाव न घेता थेट चित्रा वाघ यांच्यावर आक्रमक हल्ला केलाय. ‘बलात्कार, डान्सबार आणि राजकारणी नेते महिलांना तिच्या कपड्यांमुळे मारण्याची उघडपणे धमकी देतात, हा भारतीय संस्कृतीचा भाग नाही’, असं उर्फीनं म्हटलंय.

 

उर्फीनं काही लेण्यांचे फोटोदेखील ट्विट केले आहेत. त्यात ती म्हणते, ‘प्राचीन हिंदू स्त्रिया अशाप्रकारे पेहराव करत असत. हिंदू उदारमतवादी होते, शिक्षित होते, स्त्रियांना त्यांचे कपडे निवडण्याची मुभा होती, खेळ, राजकारणात त्यांचा सक्रिय सहभाग होता. ते लैंगिक आणि स्त्री शरीराबाबत सकारात्मक लोक होते. प्रथम भारतीय संस्कृतीबद्दल जाणून घ्या’, असा सल्लाही उर्फीनं नाव न घेता चित्रा वाघ यांना दिलाय.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :