उर्फी जावेद प्रकरणावरुन चित्रा वाघ यांच्याकडून महिला आयोगाचा अपमान ?

spot_img

उर्फी जावेद प्रकरणावरुन चित्रा वाघ यांच्याकडून महिला आयोगाचा अपमान ?

 

 

उर्फी जावेदच्या व्हिडिओवरुन चित्रा वाघ या चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी रूपाली चाकणकर यांच्यासह महिला आयोगावर आरोप केला. त्यावर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेत चित्रा वाघ यांचीच अडचण वाढवून ठेवली. चित्रा वाघ यांना महिला आयोगानं नोटिस बजावून दोन दिवसांच्या आत उत्तर देण्याचं सांगितलंय.

 

चाकणकर यांनी म्हटलंय, की चित्रा वाघ यांनी महिला आयोगाची बदनामी केली आहे. महिला आयोगाची गरिमा राखली नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. राज्य महिला आयोगाला 25 जानेवारीला 30 वर्ष पूर्ण होताहेत. राज्यात वेगवेगळे उपक्रमाचं आयोजन करण्यात येतंय.

 

काल चित्रा वाघ यांची पत्रकार परिषद झाली त्यामध्ये राज्य महिला आयोगावर टिका करण्यात आली. महिला आयोग ही एक स्वायत्त संस्था आहे. तक्रार आल्यानंतर विधी विभागाशी चर्चा करून ही संस्था निर्णय घेते. काल झालेल्या पत्रकार परिषदेत ही पत्रकारांना खोटी माहिती दिली, असं चाकणकर म्हणाल्या.

 

राज्य महिला आयोगानं तेजस्विनी पंडीत यांना नाही, संजय जाधवांना पत्र दिलं आहे. अनुराधा या मालिकेसंदर्भात पाठवलं होतं. संजय जाधवांनी आयोगाला पाठवलं उत्तर होतं. अनेक पालकांनी वेब सिरिजच्या विरोधात तक्रारी करण्यात आल्या होत्या, चित्रा वाघ यांनी चुकीची माहिती दिली.

 

तेजस्विनी पंडीतला महाराष्ट्राची लेक म्हणून दिली, उर्फी जावेदला दिली नाही, स्वतःच्या प्रसिद्धीसाठी त्यांनी ही टिका केली आहे.

 

आम्ही चित्रा वाघ यांना नोटीस पाठवली आहे. त्यांना नोटीस मेलद्वारे पाठवण्यात आली आहे. महिला आयोगाची अप्रतिष्ठा केली आहे. आयोगाच्या कामकाजाबाबत समाजात अविश्वास निर्माण होईल, असं वक्तव्य केलं आहे.

 

आयोगाचा अवमान केल्याप्रकरणी राज्य महिला आयोग नोटीस पाठवत आहे. दोन दिवसांत खुलासा करावा. दोन दिवसांत खुलासा केला नाही तर म्हणणं नाही म्हणून आयोग एकतर्फी कारवाई करील.

 

चित्रा वाघ यांना इशारा देत भारतीय संविधानानं व्यक्ती स्वातंत्र्य दिलं आहे. उर्फीचं समर्थन कोणी करावं, हे त्यांनी सांगायचं गरज नाही. चित्रा वाघ या काही काळ आयोगाच्या सदस्या होत्या. पण अध्यक्ष कसा निवडला जातो, हा त्यांचा अभ्यास कमी पडला.

 

त्यामुळे अशा विषयात वेळ वाया घालवणं गरजेचं नाही, ‘मास्टर माईंड’ कोण, याबाबत त्या नेहमी बोलतात. पण रघुनाथ कुचिक प्रकरणात त्या तोंडावर पडल्या, संजय राठोड प्रकरणात तोंडावर पडल्या.

 

मुंबई पोलिसांना भेटायला गेल्या, त्यांच्या बालिशपणाची दखल पोलिसांनी घेतली नाही. योग्य वेळ म्हणजे कोणती वेळ सांगून टाका, ‘मास्टर माईंड’ काय हे त्यांनी एकदा सांगून टाकावं, असंही चाकणकर म्हणाल्या आहेत.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :