उपरवाला जब भी देता हैं तो छप्पर फाड के देता हैं’ !अहमदनगरच्या ‘या’ आज्जीला आलाय हा अविस्मरणीय अनुभव ! 

spot_img

‘उपरवाला जब भी देता हैं तो छप्पर फाड के देता हैं’ !अहमदनगरच्या ‘या’ आज्जीला आलाय हा अविस्मरणीय अनुभव !

 

 

नशीब का म्हणतात ना, ते काही लोकांचं कधी आणि किती फळफळेल, हे तुम्ही आम्ही कधीच सांगू शकणार नाही. पण हे नशीब जर का फळफळलं, तर मग त्या व्यक्तीला आकाशदेखील ठेंगणं होतं. म्हणजे आपल्याकडे हिंदीत असं नेहमी म्हटलं जातं, ‘उपरवाला जब भी देता हैं तो छप्पर फाड के देता हैं’ । मात्र हे आतापर्यंत नुसतं म्हटलं जात नव्हतं तर अहमदनगरच्या ‘या’ आज्जीला हा अविस्मरणीय अनुभव आलाय.

 

 

शांताबाई रघुनाश कानडे असं या आज्जीबाईचं नाव आहे. नगरच्या बाजारात जात असलेल्या या ८० वर्षीय आजीचं नशीब असं फळफळलं, कि ती तब्बल ८ कोटींची मालकीण झालीय.  या आज्जीनं बाजारामध्ये जात असताना गॅस स्टेशनवरून लॉटरीचे तिकीट विकत घेतलं होत.

 

 

जेव्हा त्या आज्जीनं त्या तिकिटाचं कूपन स्क्रॅच केलं, तेव्हा तिला आश्चर्याचा धक्काच बसला होता. त्या वृद्ध महिलेनं रँडमली स्क्रॅच ऑफ तिकीट खरेदी केले होते. तिकीट घेतल्यानंतर महिलेनं कोड स्क्रॅच केला आणि ती तब्बल 8 कोटी रुपयांची लॉटरी जिंकली होती.

 

 

8 कोटी रुपयांची लॉटरी जिंकल्यानंतर त्या महिलेनं लॉटरी अधिकाऱ्यांना सांगितलं, की पहिल्यांदा तिनं या तिकिटाचा बार कोड स्क्रॅच केला. त्यानंतर काय जिंकलं आहे, ते पाहण्यासाठी स्कॅन केलं आणि आश्चर्य म्हणजे मशीननं क्लेम फाईल करण्यास सांगितलं.

 

त्यामुळे लॉटरीचं तिकीट त्या महिलेनं पुन्हा पुन्हा स्कॅन केलं. परंतू तिला पुन्हा पुन्हा तोच मेसेज आला. तेव्हा तिला वाटले, की  मशीन असेल. पण मशीन खराब नाही तर तिला खरंच 8 कोटींची लॉटरी लागली होती.

 

ती महिला म्हणाली की, जेव्हा समजलं, 8 कोटी मिळणार आहेत तेव्हा तिला  विश्वास बसला नाही. लॉटरीचं तिकीट जिंकल्यामुळे महिला खूप आनंदी होती. त्यानंतर ती महिला तिच्या घरी गेली. मात्र त्या रात्री तिला झोपदेखील आली नाही.

 

लॉटरीमध्ये जिंकलेली रक्कम ती खर्च करणार नसून बचत खात्यात टाकणार असल्याचे ती म्हणली आहे. यासोबतच महिलेनं लॉटरी अधिकाऱ्यांना तिची ओळख कोणाला सांगू, नये अशी विनंती केली आहे. परंतु त्या महिलेची लाॅटरी जिंकल्याची पोस्ट सोशल मिडियावर पसरली आहे.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :