उपजिल्हाधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल ; जिवे मारण्याचा प्रयत्न !..

spot_img

पत्नीच्या तक्रारीवरून लातुरात उपजिल्हाधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा; जिवे मारण्याचा प्रयत्न

लातूर : हुंडा व इतर किरकोळ कारणावरून मानसिक, शारीरिक छळ करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार लातूरचे उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात उपजिल्हाधिकारी महाडिक यांच्यावर बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीत म्हटले आहे, २०१८ मध्ये माझा विवाह झाला आहे. तेव्हापासून हुंडा व किरकोळ कारणांसाठी माझा मानसिक, शारीरिक छळ करण्यात आला. २ एप्रिल २०२१ मध्ये माझ्या पतीने मला व मुलास माहेरी सोडले.

त्यानंतर मला नांदवण्यास तयार नव्हते. त्यामुळे मी पुणे येथील हिंजवडी येथे नोकरी करून माझ्या मुलासोबत राहत होते. तरीही पतीने मला वारंवार फोन करून शिवीगाळ व दमदाटी केली.

त्यावेळी मी हिंजवडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने कलम ४९८ अ, ५०६ ५०४ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी पती गणेश महाडिक यांनी माझ्याशी चर्चा केली, मी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून लातूर येथे वास्तव्यास आले.

२३ मे २०२२ रोजी घरात सासूसोबत वाद झाला. माझ्या हाताला धरून पतीने घराबाहेर हाकलून दिले. अर्ध्या तासांनी घरात घेतल्यावर मला मारहाण करण्यात आली. यात माझ्या पाठीवर व उजव्या बरगडीवर मार लागल्याने रुग्णालयात दाखविले असता तीन बरगड्या मोडल्या असल्याचे सांगितले.

१३ डिसेंबर रोजी शिवाजी नगर पोलिस ठाण्यात प्रत्यक्ष हजर राहून तक्रार दिल्याने गणेश भिकाजी महाडिक, सासू लता भिकाजी महाडिक यांच्यावर कलम ४९८ अ, ३०७, ३२६ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पी.एल. निळकंठे हे करीत आहेत.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :