उच्चशिक्षित दाम्पत्यानं अशिक्षित आईकडून घेतलं मार्गदर्शन ! रोप विक्रीतून कमवले 5 लाख रुपये !

spot_img

उच्चशिक्षित दाम्पत्यानं अशिक्षित आईकडून घेतलं मार्गदर्शन ! रोप विक्रीतून कमवले 5 लाख रुपये !

एका उच्चशिक्षित दांपत्यानं त्यांच्या अशिक्षित आईच्या मार्गदर्शनाखाली एक व्यवसाय उभारला. पाच वर्षांमध्ये 25 लाख रोपे तयार करून त्यांच्या विक्रीसाठी पाच लाख रुपये उत्पन्न मिळवले.

वर्षाकाठी ते पाच लाख रोपे तयार करतात आणि त्यासाठी चार लाख रुपये खर्च करून निव्वळ नफा एक लाख रुपये त्यांना मिळतो. या व्यवसायातला अनुभव त्यांनी अशिक्षित आईकडून आत्मसात करुन घेतला.

या सगळ्या प्रवासामध्ये त्यांनी ठरवले की भाजीपाला रोपवाटिका घराच्या छतावर उभारायची. त्यांनी त्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातल्या भाळवणी येथून सन 2018 मध्ये कोकोपीट विकत घेतले.

ते ट्रेमध्ये भरून टोमॅटो, मिरची, शेवगा, वांग्यासारख्या भाजीपाला पिकांची रोपे पत्नी आणि आईच्या मदतीने तयार करायला सुरुवात केली.

यासाठी त्यांनी पाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी स्वतंत्र बोअर घेतला. ते पाणी टाकीत लिफ्ट करून घराच्या छतावर असलेल्या रोपांना पुरवले.

या माध्यमातून दरवर्षी ते पाच लाख रोपे तयार करतात. 40 ते 45 दिवसांत हे रोपे तयार होतात. तयार केलेली रोपांची ते कडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये एका दुकानात ठेवून प्रतिरोप एक ते दीड रुपयाप्रमाणे शेतकऱ्यांना विक्री करताहेत.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :