आयपीएल मॅचवर सट्टा ; पोलिसांनी आवळल्या सट्टेबाजांच्या मुसक्या !

spot_img

आयपीएल मॅचवर सट्टा ; पोलिसांनी आवळल्या सट्टेबाजांच्या मुसक्या !

पुण्याच्या कोंडवा परिसरात असलेल्या साईबाबा नगर मधील धर्मश्री सिग्नेचर सोसायटीमध्ये असलेल्या एका प्लेटमध्ये आयपीएलवर सत्ता लावण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी या फ्लॅटवर छापा टाकत सट्टेबाजांच्या मुसक्या आवळल्या.

पुणे पोलिसांनी शनिवारी तिघा सट्टेबाजांना अटक केली आहे या रॅकेटमध्ये पुण्याच्या कोरेगाव पार्कमधील एका मालकाचा समावेश आहे या मालकासह मध्य प्रदेश आणि दुबईतल्या बुकींचाही या सट्टेबाजांमध्ये समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी वसीम हनीफ शेख, इक्रामा मकसूद मुल्ला, मुसाबीन मेहमूद बाशाइब या तिघांसह पुण्यातल्या कोरेगाव पार्क परिसरातल्या एका प्रसिद्ध पबचा मालक जितेश मेहता, मध्यप्रदेशचा बडा बुकी अक्षय तिवारी या सर्वांना अटक केली

या सर्वांविरुद्ध पुण्यातल्या कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये भादवि 420, 34 तसेच जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम ४ (अ) ५ सह भारतीय टेलिग्राफ ॲक्ट कलम २५ (क) गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलीस नाईक शंकर शिवाजी संपते यांनी फिर्यादी दिली.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :