आम्ही फक्त सिग्नलवरच भीक मागायची का ? ‘या’ तृतीयपंथीय व्यक्तीनं विचारलाय प्रश्न !

spot_img

टीम । महासत्ता भारत
Team । Mahasatta Bharat

देशात काही तृतीयपंथी सनदी अधिकारी, आयपीएस अधिकारी, पोलीस निरिक्षक, पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्रातच तृतीयपंथींना असंवेदनशिल वागणूक का, असा प्रश्न उपस्थित करत आम्ही काय फक्त रस्त्यावर, सिग्नलला भिक मागायची का? सरकारने आमच्याकडे माणूस म्हणून पहावे.

आम्हाला सन्मानाने जगण्यासाठी पोलीस भरतीमध्ये नोकरीची संधी द्यावी, असा प्रश्न निकिता मुख्यदल (तृतीयपंथी, पिंपरी चिंचवड) यांनी उपस्थित केलाय. दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विभागांमध्ये कंत्राटी तत्त्वावर नोकरी करून काही तृतीयपंथी सध्या सन्मानाचे जीवन जगत आहेत.

यातलेकाही तृतीयपंथी हे पोलीस भरतीची तयारी करत आहेत. मात्र, राज्यात पोलीस दलाच्या भरतीत अर्ज करताना त्यांना तृतीयपंथी म्हणून रकानाच (काॅलम) दिला गेलेला नाही. परिणामी त्यांना नोकरीसाठी अर्ज करता आला नाही. त्यामुळे तृतीयपंथी असलेल्या निकिता मुख्यदल यांनी न्यायालयीन लढा सुरू केला आहे.

एमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत तृतीयपंथींची व्यथा ऐकविली. पोलीस भरतीमध्ये तृतीयपंथींना संधी देण्याची मागणी केली. मात्र, त्याचा काहीही फायदा झाला नाही. त्यानंतर मुख्यदल यांनी ‘मॅट’मध्ये धाव घेतली. तृतीयपंथींसाठी पोलीस भरतीत जागा ठेवा, असे ‘मॅट’ने सांगितले.

तरीही भरतीमध्ये तृतीयपंथींसाठी जागा ठेवण्यात आली नाही. अशातच तृतीयपंथींना पोलीस भरतीमध्ये संधी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून करण्यात आली. पिंपरी येथे रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, कविता आल्हाट, कविता खराडे, इम्रान शेख, विनायक रणसुंभे, दत्तात्रय जगताप उपस्थित होते.

राज्य सराकरने तृतीयपंथींबाबत योग्य धोरण आखावे. त्यांचे अधिकार त्यांना द्यावेत. जर पोलीस भरतीत तृतीयपंथींना संधी मिळाली नाही तर न्यायालयीन लढा उभारण्यात येईल, असे अजित गव्हाणे यांनी यावेळी सांगितले.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :