आमदार थोरात हे भाची समजून आपल्या मागे उभे राहतील”; शुंभागी पाटलांचा विश्वास, काल गेटवरूनच परतल्या

spot_img

“आमदार थोरात हे भाची समजून आपल्या मागे उभे राहतील”; शुंभागी पाटलांचा विश्वास, काल गेटवरूनच परतल्या

 

नाशिक :  विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीकरीता राजकीय पक्षांनी, उमेदवारांनी आपल्या प्रचाराची सुरूवात केली आहे. यातच नाशिकच्या पदवीधर मतदार संघाच्या उमेदवार शुंभागी पाटील ह्या काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या भेटीसाठी त्यांच्या सुदर्शन निवासस्थानी गेल्या. मात्र त्यांना गेटच्या बाहेरचं थांबवलं लागल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. त्यावर आता शुंभागी पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

बाळासाहेब थोरात यांच्या भेटीला गेलेल्या शुंभागी पाटलांचा गेटवरील व्हिडीओ काल दिवसभर समाज माध्यामांवर फिरत होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधान आलं होतं. मात्र बाळासाहेब थोरात आजारपणामुळे कुटुंबासह मुंबईत असल्याने भेट झाली नसल्याची प्रतिक्रिया शुंभागी पाटील यांनी दिली आहे. तसेच मला महाविकास आघाडीचा पाठिंबा असून आमदार थोरात हे भाची समजून आपल्या मागे उभे राहतील. यामुळे आपला विजय निश्चित आहे. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

 

काल बाळासाहेब थोरात उपचारासाठी मुंबई येथे असल्याची कल्पना नाशिक पदवीधरच्या उमेदवार शुंभागी पाटील यांना असतांनाही त्यांच्या बंगल्यावर जाण्याचा अट्टाहास का केला गेला? अशी दुसऱ्या बाजूलाही चर्चा सुरू आहे. तर आपल्याला प्रवेश नाकारल्याचा दावाही पाटील यांनी केला आहे. त्यांच्याविरोधात काॅंग्रेसचे माजी युवा अध्यक्ष सत्यजित तांबे असून ते बाळासाहेब थोरात यांचे भाचे लागत आहेत. त्यामुळे बाळासाहेब थोरात हे पाटील यांना या निवडणुकीकरीता मतद करणार का ? अशी चर्चाही रंगली आहे.

दरम्यान, ऐनवेळी काॅंग्रेसचे उमेदवार डॉ.सुधीर तांबे यांनी काॅंग्रेसच्या विरोधात बंडाळी केल्याने त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले. तर त्यांच्या जागी सुधीर तांबे यांनी त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांना पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीची उमेदवार दिली. त्यानंतर त्यांनाही काॅंग्रेसने सहा वर्षाकरीता निलंबित केले आहे. त्यामुळे आता याठिकाणी सत्यजित तांबे विरूद्ध शुंभांगी पाटील अशी लढत होणार असून शुंभागी पाटलांना महाविकास आघाडीने आपला पाठिंबा जाहीर केला आहे. तर भाजपने अद्यापही आपला पाठींबा जाहीर केलेला नाही. मात्र सत्यजित तांबे यांच्यामागे अनेक काॅंग्रेसचे कार्यकर्ते असल्याचं समजत आहे.

 

 

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :