आता दहा हजारांत मिळणार स्मार्ट फोन ! वाचा ‘ही’ माहिती सविस्तर!

spot_img

स्मार्ट फोन आजच्या आयटी Information Tecnology युगातली काळाची गरज बनलीय. स्मार्ट फोन किंवा अँड्राॅईड मोबाईल सध्याच्या युगातला मानवाचा अविभाज्य असा घटक बनलाय, अस म्हटल्यास ती अतिशयोक्ति ठरणार नाही.

आज काल असंही म्हटलं जातं, की एखाद्याचा मोबाईल काही वेळासाठी जरी नादुरुस्त झाला, तरी त्याच्या घरातलंच कोणी तरी आजारी आहे की काय, अशी त्या मोबाईलच्या वापरकर्त्याची अवस्था होते. आज काल या स्मार्ट फोन किंवा अँड्राॅईड मोबाईलमुळे सोशल मिडिया जोरात आहे.

आजच्या जमान्यात ज्याच्याकडे स्मार्ट फोन किंवा अँड्राॅईड मोबाईल फोन नाही, तो म्हणजे अश्म युगातला कोणी तरी आहे, अशीच सोशल मिडिया युजर्सची एक प्रकारे समजूत झालीय.

तुम्ही मात्र काळजी करु नका. कारण स्मार्ट फोन घ्यायला आता तुम्हाला २० – २५ हजार रुपये खर्च करायची काहीच आवश्यकता नाही. अवघ्या दहा हजार रुपयांत तुम्ही स्मार्ट फोन खरेदी करु शकता. या लेखात त्या सर्व अँड्राॅईड मोबाईल फोनविषयी माहिती आहे. तुम्ही ती सविस्तर वाचली तर तुम्हाला तुमच्या खिशाचा बरोब्बर अंदाज येईल.

यामध्ये पहिला आहे POCO M5 स्मार्टफोन. हा 10 हजार 499 रुपयांचा असला तरी हा तुम्ही डिस्काऊंटनंतर कमी किंमतीमध्ये खरेदी करू शकता. याचं 4 GB RAM आणि 64 GB स्टोरेज ऑप्शन या किंमतीत उपलब्ध आहे. या हँडसेटमध्ये MediaTek Helio G 99 प्रोसेसर देण्यात आला आहे. तसंच यात 5 हजार mAh ची जबरदस्त बॅटरीही देण्यात आलीय. या स्मार्टफोनमध्ये 50 MP च्या मेन लेन्स वाला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तसंच फ्रन्टमध्ये 8 MP कॅमेरा देण्यात आलाय.

दुसरा स्मार्ट फोन आहे Y0 2. विवो कंपनीनं हा स्मार्टफोन नुकताच लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये 3 GB RAM आणि 32 GB स्टोरेज मिळतं. या स्मार्टफोनची किंमत 8 हजार 999 रुपये आहे. या स्मार्टफोनमध्ये कंपनीनं अतिशय जुना असलेला MediaTek Helio P 22 प्रोसेसर दिला आहे. तसंच हा स्मार्टफोन अँड्रॉईड 12 गो एडिशनवर काम करतो. यामध्ये 8 MP चा रियर आणि 5 MP चा फ्रन्ट कॅमेरा मिळतो. या स्मार्टफोनमध्ये 5 हजार mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

तिसरा स्मार्ट फोन आहे Lava Blaze 5G. लावा कंपनीचा हा एकमेव ऑप्श आहे, जो 5 G सपोर्टसह येतो. कंपनीनं हा स्मार्टफोन इंट्रोडक्टरी प्राईजमध्ये लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये 5 हजार mAh बॅटरी, 50 MP कॅमेरा, अँड्रॉईड 12 आणि MediaTek Dimensity 700 प्रोसेसर मिळतो. हा स्मार्टफोन तुम्ही 9 हजार 999 रुपयांना खरेदी करु शकता.

चौथा स्मार्ट फोन आहे Realme Narzo 50i Prime. कमी बजेटवाल्या दमदार स्मार्टफोनच्या लिस्टमध्ये रियलमीचा हा स्मार्टफोन येतो. याच्या 4 GB RAM + 64 GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 8 हजार 999 रुपये आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉईड 11 बेस्ड यूआयवर काम करतो. या स्मार्टफोनमध्ये 5 हजार mAh ची बॅटरी, Unisoc T 612 प्रोसेसर, 8 MP रियर कॅमेरा आणि 5 MP फ्रन्ट कॅमेरा मिळतो.

दरम्यान, काही चिनी ब्रँड्सनं कमी किंमतीच्या फोन्सद्वारे भारतात आपली जागा निर्माण केली आहे. याचमुळे वाढत्या किंमतीही आव्हान झालं आहे. या आव्हानाचा सामना करत असताना काही कंपन्या १० हजारांपेक्षा कमी किंमतीचे काही स्मार्टफोन्स लाँच करत असतात. हे त्यातल्याच काही कंपन्यांचे स्मार्ट अँड्राॅईड फोन्स आहेत. पहा, नीट विचार करा, एक कुठला तरी चांगला स्मार्ट घ्या आणि सोशल मिडियामार्फत जगाला जवळ आणा.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :